पाय सांगतात पर्सनॅलिटी! मळकट पाऊले, कळकट तुटलेली नखं स्वभावाची सगळी सिक्रेट सांगतात, वाचा काय हे शास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 03:27 PM2021-09-17T15:27:11+5:302021-09-17T15:57:06+5:30

Foot tells about personality : जे लोक आपली पायांची बोटं वेगळी करू शकत नाहीत. त्यांना आपल्या जीवनात बदल आवडतात. एकच रूटीन त्यांना फारसं आवडत नाही. असे लोक खूप लवकर कोणत्याही गोष्टीत कंटाळतात.

हस्तरेखाशास्त्र सगळ्यांनाच माहीत आहे. पण हातांप्रमाणेच पायसुद्धा तुमच्या व्यक्तिमत्वबद्दल खूप काही सांगू शकतात हे जास्त लोकांना माहिती नाही. तुमचे पायही व्यक्तीमत्वाची ओळख करून देतात, जाणून घ्या ओळख करून देतात म्हणजे पायांच्या रचनेवरून नेमकं काय समजतं ते.

जास्तीत जास्त लोकांच्या पायाचा आकार असा असतो. सगळी बोटं सरळ असतात. अंगठा सगळ्यात मोठा असतो. असे लोक फिरण्याचे खूप शौकिन असतात.

अशा पायांच्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व खूप खास असते. हे लोक व्यावसाईक किंवा चांगला वक्ता बनतात.

यात पायांची बोटं चौकोनी असतात. असा आकार असलेले लोक स्वभावानं शांत असतात. कोणताही निर्णय ते विचारपूर्वक घेतात.

स्क्वेअर फूट रचनेचे पाय असलेले लोक विश्वासू आणि व्यावहारिक असतात.

या रचनेला फ्लेम फूट असंही म्हटलं जातं. या प्रकारात दुसरं बोट अंगठ्यापेक्षा मोठं असतं. अशा पायांचे लोक खूप जास्त उत्साही असतात आणि प्रेरणादायीसुद्धा. अशा रचनेचे पाय असलेले जास्तीत जास्त लोक अॅथलेट किंवा वक्ता होतात.

असे पाय असणार बरेच लोक सड पातळ असतात. त्यांच्या पायांची बोट एकमेंकाना लागून असतात. असे लोक आपल्या प्रायव्हसीबाबत तडजोड करत नाहीत. त्यांचा मूड सतत बदलत राहतो.

शेवटची लहान बोटं इतर इतर बोटांपासून वेगळी राहत नसतील तर त्या लोकांचे रूटीन व्यवस्थित असते. असे लोक खूप प्रामाणिक असतात.

जे लोक आपली पायांची बोटं वेगळी करू शकत नाहीत. त्यांना आपल्या जीवनात बदल आवडतात. एकच रूटीन त्यांना फारसं आवडत नाही. असे लोक खूप लवकर कोणत्याही गोष्टीत कंटाळतात.

अशा लोकांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं चांगल्याप्रकारे जमतं. गरज पडल्यास असे लोक खूप कमी वेळात आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवतात.

जर तुमची बोटं तर्जनीकडे झुकत असतील तर यावरून दिसून येतं की ती व्यक्ती नेहमी घाई गडबडीत राहते. याच घाईमुळे त्यांना अनेकदा संकटांचा सामना करावा लागतो.

अशा प्रकारच्या बोटांची रचना असलेले लोक आपल्या भूतकाळातील घटनांमध्ये जास्त रमलेले असतात. जुन्या आठवणींना विसरणं त्यांच्यासाठी अवघड असतं. ते लवकर मुव्हऑन होत नाहीत.

Read in English