ऑफिससाठी फॉर्मल लूक देणारं ब्लाऊज शिवायचंय? ७ सुंदर 'नेक डिझाईन्स'- दिसाल स्टायलिश, आकर्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2024 03:17 PM2024-03-19T15:17:06+5:302024-03-19T15:24:12+5:30

ऑफिसमध्ये साडी नेसायची असेल तर ब्लाऊज अशा पद्धतीने शिवायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला परफेक्ट फॉर्मल लूक मिळेल. यासाठीच ब्लाऊजचे डिझाईन्स नेमके कसे घ्यायचे ते पाहा...

असं स्टॅण्ड कॉलरचं ब्लाऊज ऑफिससाठी एकदम शोभून दिसतं. याच्या बाह्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता.

स्टॅण्ड कॉलर प्रकारात अशा पद्धतीचं समोरच्या बटनांचं ब्लाऊजही शिवून पाहा.

असं कॉलरचं ब्लाऊज शिवण्याचीही हल्ली खूप फॅशन आहे. असं एखादं ब्लाऊज तुमच्या कलेक्शनमध्ये असू द्या.

जास्त डिप नसलेला व्ही शेप नेकदेखील फॉर्मल लूकसाठी छान वाटतो.

कॉटनची साडी असेल तर असं बंद गळ्याचं बोट नेक ब्लाऊज शोभून दिसतं.

बोट नेक न घेता असं पूर्ण बंद गळ्याचं ब्लाऊज शिवण्याचाही सध्या खूप ट्रेण्ड आहे.

स्टॅण्ड कॉलर नेक आणि समोरच्या बाजूने छोटासा व्ही कट असं ब्लाऊजही फॉर्मल लूकसाठी चांगलं आहे.