हिवाळ्यात असा कॅरी करा तुमचा प्रोफेशनल लूक, थंडीतही ऑफीसमध्ये दिसाल उठून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2022 04:21 PM2022-11-18T16:21:59+5:302022-11-18T16:25:52+5:30

Formal Professional look in Winter Fashion Tips : ऑफीसमध्ये आपली प्रतिमा चांगली राहावी यासाठी आपला ड्रेसिंग सेन्स चांगला असणे आवश्यक असते.

ऑफीसला जाताना दिसेल ते काहीही घालून जाणं हे गबाळेपणाचं लक्षण आहे. पण हेच सध्याच्या ऋतूला साजेसं आणि चांगलं टापटीप राहणं हे ऑफीसमध्ये आपली प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी अतिशय गरजेचे असते (Formal Professional look in Winter Fashion Tips).

सध्या थंडीच्या दिवसांत बाहेरही गारठा आणि ऑफीसमध्येही एसी लावलेले असण्याची शक्यता असते. अशावेळी आपल्याला थंडीही वाजणार नाही आणि आपण प्रोफेशनल आणि चांगले दिसू यासाठी योग्य पद्धतीची फॅशन कॅरी करणे गरजेचे असते.

तुम्हाला ऑफीसमध्ये इंडीयन आऊटफीटस घालायचे असतील तर तुम्ही थोडे जाड कापडाचे, फूल बाह्यांचे कुर्ते आणि त्यावर पँट किंवा लेगीन्स पेअर करु शकता. हे कुर्ते स्वच्छ आणि इस्त्री केलेले असतील याची मात्र काळजी घ्यायला हवी.

तुम्ही फॉर्मल वेअर वापरत असला तर एखादा छानसा कोट किंवा जॅकेट तुम्ही ऑफीसमध्ये नक्की कॅरी करु शकता. यामुळे तुम्हाला थंडी तर वाटणार नाहीच पण तुम्ही रुबाबदार दिसण्यास त्याची चांगली मदत होईल.

ऑफीसमध्ये तुम्हाला काही कारणाने साडी नेसणे भाग असेल तर कॉटनची थोडी जाडसर अशी साडी तुम्ही नक्की नेसू शकता. यावर तुम्ही थोड्या मोठ्या बाह्यांचे ब्लाऊज घालायला हवे. तसेच यावर फॉर्मल लूक असलेले घडयाळ, सिंपल दिसेल अशी ज्वेलरी तुम्ही कॅरी करायला हवी.

शॉर्ट ड्रेस घालत असाल तर त्यावर तुम्ही एखादा कोट किंवा फॅशनेबल जॅकेट कॅरी केले तर तुमचा लूक उठून दिसण्यास मदत होईल.

विकेंडला किंवा एरवीही तुम्ही जीन्स वापरत असला तर त्यावर तुम्ही एखादा छानसा पुलोव्हर किंवा पोलो नेक स्वेटशर्ट नक्की कॅरी करु शकता. त्यामुळे थंडीपासूनही तुमचे संरक्षण होईल आणि तुमच्या हटके फॅशनमुळे सगळ्यांचे तुमच्याकडे नकळत लक्ष जाईल.