IPL लिलाव गाजवणाऱ्या या कोण 4 ग्लॅमरस मुली; खेळाडूंपेक्षा त्यांचीच जास्त चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 04:33 PM2022-02-12T16:33:59+5:302022-02-12T16:37:36+5:30

१. क्रिकेट आणि बॉलीवूड (cricket and bollywood) जिथं एकत्र होतं, तिथंच भारतीयांची विकेट पडते म्हणून समजा.. आयपीएलही तसंच.. क्रिकेट आणि बॉलीवूडचे सितारे यानिमित्ताने एकत्र येतात.. त्यामुळेच तर भारतीयांकडून आयपीएल सोहळ्याला भरभरून प्रेम मिळतं.... मागच्या दोन- तीन वर्षांपासून आयपीएलमध्ये केवळ बॉलीवूड स्टारच नाही, तर त्यांच्या स्टार कन्या आणि स्टार पुत्रही दिसू लागले आहेत..

२. अगदी सुरुवातीपासूनच आयपीएलमध्ये जुही चावला, प्रिती झिंटा, नीता अंबानी, शिल्पा शेट्टी या सेलिब्रिटींचा विशेष सहभाग आहे.. खेळाडूंची बोली लावण्यापासून ते मैदानावर आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यापर्यंत प्रत्येक गोष्टींमध्ये या वुमन वॉरीयर्सचा मुख्य आणि उत्साहपुर्ण वावर असतो..

३. आता याच्या पुढची पिढी मागच्या एक- दोन वर्षांपासून दिसू लागली आहे. नुकतंच यावर्षीच्या आयपीएलच्या लिलावाचं जे ब्रिफिंग झालं त्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरूख खान याची कन्या सुहाना खान दिसून आली. सुहाना तिच्या भावासोबत म्हणजेच आर्यनसोबत तिथे आली होती.

४. काही वर्षांपुर्वी आयपीएल लिलावात गायत्री रेड्डी हिचा ग्लॅमरस वावरही असाच चर्चेत होता. डेक्कन क्रॉनिकल्सचे मालक टी. वेंकटराम रेड्डी यांची ती मुलगी. २००८ साली प्रिमियर लीग सुरू झाली तेव्हा खेळाडूंची निवड करून संघ बांधणी करण्यासाठी प्रत्येक गोष्टीत गायत्रीने उत्साहाने सहभाग घेतला हेाता. तिच्याच संकल्पनेनुसार तेव्हा डेक्कन चार्जर्सची टीम तयार झाली होती.

५. आयपीएल लिलावामध्ये दिसून आलेला आणखी एक सुंदर चेहरा म्हणजे काव्या मारन. २०२० मध्ये झालेल्या लिलावात काव्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले हेाते. काव्या मारन म्हणजे सन टीव्ही नेटवर्कचे मालक आणि सनरायझर्सचे संस्थापक कलानिधी मारन यांची मुलगी. काव्याचा तिच्या टीमला खूप तगडा सपोर्ट दिसून आला. मैदानावर जाऊन ती तिच्या टिमला चिअरअप करतानाही अनेकदा दिसून आली.

७. जान्हवी मेहता म्हणजे अभिनेत्री जुही चावला आणि जय मेहता यांची लेक. हे दोघेही शाहरुखच्या कोलकाता नाईट रायडर्स टीमचे सहमालक अहेत. २०१८ साली झालेल्या लिलावात जान्हवीचा सक्रिय सहभाग होता.. तिनेही खेळाडूंची बोली लावून संघबांधणी करणे, आपल्या संघाला मैदानावर जाऊन चिअरअप करणे, अशा सगळ्या गोष्टी मोठ्या उत्साहात केल्या होत्या. त्यावर्षी पहिल्यांदाच ती आयपीएलमध्ये एवढ ॲक्टीव्ह दिसून आली..