विविध आजारांवर गुणकारी ठरतो फळांचा रस! कोणत्या आजारासाठी कशाचा रस प्यावा? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 12:51 PM2022-11-16T12:51:52+5:302022-11-16T12:58:34+5:30

१. आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या आजारांवर अनेक घरगुती उपाय सांगितलेले आहेत. कधी कोणत्या त्रासासाठी काढा गुणकारी ठरतो, तर कधी स्वयंपाक घरातील काही पदार्थ उपयुक्त ठरतात.

२. फळं, भाज्या यांच्या रसामध्येही असे अनेक आजार बरे करण्याची क्षमता असते. नेमका कोणता त्रास असेल तर कोणत्या फळांचा रस घेणे त्यासाठी गुणकारी ठरते, याविषयीची माहिती healthy_living_with_palki या इन्स्टाग्राम पेजवर आहारतज्ज्ञांकडून शेअर करण्यात आली आहे.

३. त्यामुळे अधूनमधून तब्येतीच्या लहानशा तक्रारी जाणवल्यास फळांचा रस घेऊन बघायला हरकत नाही. पण वारंवार तिव्र स्वरुपाचा त्रास होत असेल, तर घरगुती उपाय करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणंच अधिक उत्तम.

४. सर्दी, खोकला असा त्रास होत असेल तर मोसंबीचा रस घेणे चांगले. या रसामध्ये थोडीशी हळद, आल्याचा रस आणि मध टाकावा.

५. थायरॉईडचा त्रास होत असल्यास गाजर, बीट आणि अननस सम प्रमाणात घेऊन त्यांचा एकत्रित रस घेणे फायदेशीर ठरते.

६. उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यास बडिशेप, कोथिंबीर यांचा रस लिंबू टाकून घ्यावा, असं सुचवण्यात आलं आहे.

७. सफरचंद, बीट आणि गाजर यांचा रस ॲनिमियासाठी उपयुक्त ठरतो. या रसामुळे अंगात ताकद येते आणि अशक्तपणा कमी होतो.

८. मधुमेहाचा त्रास कमी करण्यासाठी काकडी, सफरचंद आणि कारल्याचा रस लिंबू टाकून प्यावा, असा सल्ला दिला आहे.