Ganesh Chaturthi 2021: गणेश चतुर्थीला क्विक, क्लासी पारंपारीक लूक मिळवण्यासाठी 'या' घ्या भन्नाट आयडिया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 04:23 PM2021-09-08T16:23:03+5:302021-09-08T17:06:25+5:30

Ganesh Chaturthi 2021 : तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बॉलिवूडपासून छोट्या पडद्यापर्यंतच्या अभिनेत्रींना या लूकमध्ये पाहू शकता

गणेशोत्सव सुरू व्हायला अवघे काही दिवस उरलेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी कसा सिंपल डिसेंट लूक करता येईल याचा सगळ्याच महिला विचार करत असतील. गणपतीच्या दिवशी घरी इतर कामंही असतात. त्यामुळे कमीत कमी वेळात पारंपारिक लूक कसा करता येईल हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. या वेळी गणेश चतुर्थीच्या पूजेत तुम्हाला वेगळा लूक हवा असेल तर पारंपारिक महाराष्ट्रीयन लूक ट्राय करून पाहा.

महाराष्ट्रीयन पारंपारिक लुकमध्ये सर्वात खास म्हणजे त्यांचे नाथ आणि गजरा. तसेच महाराष्ट्रीय शैलीत परिधान केलेली साडी.

महाराष्ट्रीयन पारंपारिक लुकमध्ये सर्वात खास म्हणजे त्यांचे नाथ आणि गजरा. तसेच महाराष्ट्रीय शैलीत परिधान केलेली साडी. मेकअप करताना आधी चेहऱ्यावर बेस मेकअप लावा आणि डोळ्यांमध्ये खोल काजल लावा. आयलाइनरसोबतच साडीला सूट होईल असा आयशॅडो तुमचा लूक खास बनवेल.

कपाळावर कुंकू किंवा टिकली, चंद्रकोर लावल्यानंतर केसांचा मागच्या बाजूला घेऊन अंबाडा बांधा. जेणेकरून त्यात गजरा चांगल्या गोल आकारात लावता येईल. बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या नथ उपलब्ध असतात. तुम्हाला आवडते त्या प्रकारची किंवा सोन्याची नथ तुम्ही घालू शकता.

पारंपारिक महाराष्ट्रीयन लूकसाठी तुम्ही नववारीसुद्धा नेसू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हा लुक कोणत्याही बॉर्डरच्या साडीसोबत करू शकता.

साडी नेसण्यासाठी आधी कंबरेभोवती साडी गुंडाळून समोर आणा आणि मग त्यात गाठ बांध. आता साडीचा छोटासा भाग पायांच्या मधून काढा आणि मागच्या बाजूला खोचा. साडीच्या भागाच्या दुसऱ्या बाजूला चार ते पाच प्लेट्स बनवा. आणि पुढे खोचा. आता उरलेला भाग साध्या पदरासारखा लावण्यासाठी, कंबरेतून पुढे आणा आणि खांद्यावर पिनअप करा. तुमचा महाराष्ट्रीय साडीचा लूक झाला आहे.

अंकिता लोखंडेनेही महाराष्ट्रीयन लुकमध्ये तयार होऊन फोटोशूट केले होते. तिचे फोटो पाहून तुम्ही ज्वेलरी आणि मेकअपच्या आयडियाज घेऊ शकता.

तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बॉलिवूडपासून छोट्या पडद्यापर्यंतच्या अभिनेत्रींना या लूकमध्ये पाहू शकता.

माधुरी दीक्षितचा महाराष्ट्रीयन लूक सर्वात जास्त चर्चेत होता. वाटल्यास तुम्ही बाजीराव मस्तानी मधील प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणचा लुक पाहून गेटअप करू शकता.

Read in English