तुळस डेरेदार होतच नाही, पानंही हिरवीगार नसतात? किचनमधले २ पदार्थ वापरा- लगेच बहरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2024 09:02 AM2024-07-06T09:02:21+5:302024-07-06T13:24:34+5:30

बऱ्याचदा असं होतं की तुळस खूपच सुकल्यासारखी दिसते. तुळशीच्या रोपाकडे पाहिलं तर पानांपेक्षा तिच्या काड्याच जास्त दिसतात.

काही जणांच्या घरच्या तुळशीच्या रोपाची पानंही छान हिरवीगार नसतात. ती पिवळट, चॉकलेटी रंगाची होत जातात. असं तुमच्याही तुळशीच्या बाबतीत झालं असेल तर काय उपाय करावा पाहा...

तुळशीला जर पुन्हा एकदा छान हिरवीगार, डेरेदार करायची असेल तर एक सोपा घरगुती उपाय पाहा. हा उपाय loveforgardening85 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की तुमच्या स्वयंपाक घरातलेच दोन पदार्थ तुळशीसाठी उत्तम खत ठरू शकतात. यासाठी सगळ्यात आधी तर १ ग्लास पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये अर्धा टेबलस्पून आंबट दही टाका.

आता याच पाण्यात २ ते ३ चिमूट हळद टाका. हे पाणी व्यवस्थित हलवून घ्या आणि ते तुळशीला द्या.

हा उपाय महिन्यातून एकदा केल्यास तुळशीची खूप छान वाढ होईल आणि काही दिवसांतच ती हिरवीगार- डेरेदार दिसेल.