कुंडीमध्ये लावता येतील 'या' मसाल्यांची रोपं, करा प्रयोग- घेऊन पाहा घरच्या मसाल्यांचा स्वाद By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2024 09:21 AM 2024-04-11T09:21:05+5:30 2024-04-11T09:25:02+5:30
आपल्या स्वयंपाक घरातले काही मसाले असे आहेत, ज्यांची रोपं तुम्हाला तुमच्या घरच्या छोट्याशा बागेत अगदी सहज लावता येतील.
ती मसाल्यांची रोपं कोणती याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ myplantsmygarden या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
मसाल्याच्या पदार्थांमध्ये तुम्हाला ओव्याचं रोप घरी छोट्याशा कुंडीतही लावत येईल.
तेजपत्ताही घरी लावता येतो आणि त्याला मध्यम आकाराची कुंडी लागते.
धने मातीत पेरून घरच्याघरी कुंडीत ताजी कोथिंबीरही घेता येते.
मध्यम आकाराच्या पसरट कुंडीत मिरचीचं रोपही छान येतं.
घरातली थोडी बडिशेप कुंडीत टाकली तर बडिशेपेचं रोपही कुंडीत चांगलं उगवतं.
लवंगाचं रोपही कुंडीत लावता येतं. त्यासाठी आवश्यक असणारं हवामान व्यवस्थित राखता आलं पाहिजे.
घरच्याघरी हळदीचं रोपही लावता येतं.
मध्यम आकाराच्या पसरट कुंडीत आलंही लावल्या जाऊ शकतं, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.