सतत स्ट्रेस घेत असता? घरात 'ही' ५ झाडं ठेवा, पॉझिटिव्हीटी राहील-अजिबात ताण येणार नाही By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 09:47 PM 2024-10-06T21:47:45+5:30 2024-10-06T22:03:16+5:30
Gardening Tips : जर तुम्हाला अस्थमा असेल आणि नाक बंद होण्याची समस्या होत असेल तर तुम्ही घरात रबर प्लांट लावू शकता. घरात काही झाडं लावल्यानं कोर्टिसोल हॉर्मोनचा स्तर कमी होण्यास मदत होते. कोर्टिसोल एक ताण-तणाव देणारा हॉर्मोन आहे. ज्यामुळे तुम्हाला श्वासांशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. तुमचा मूडही चांगला राहतो. घरातलं वातावरण फ्रेश ठेवण्यासाठी तुम्ही ही ५ झाडं घरात लावू शकता.
पीस लिली पीस लिलीची फुलं अतिशय सुंदर असतात ज्यामुळे शांती वाढते आणि डोकंही शांत राहतं. आणि हवेतील टॉक्सिन्स बाहेर निघण्यास मदत होते.
लेव्हेंडर लेव्हेंडरचं रोप ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत होते. करते यामुळे ताण-एंजायटी कमी होण्यास मदत होते. याचा सुगंध तुमचा मूड चांगला ठेवतो आणि घरात आरामदायक वातावरण राहते.
स्पायडर प्लांट या रोपातून कोणताही सुगंध येत नाही पण या रोपामुळे तुमचा मूड चांगला राहण्यास मदत होईल. घरात हिरवळ जाणवते. ज्यामुळे ताण-तणाव कमी होतो. हानीकारक पोल्युटेंट्स खेचून ताजी हवा सोडते.
रबर प्लांट जर तुम्हाला अस्थमा असेल आणि नाक बंद होण्याची समस्या होत असेल तर तुम्ही घरात रबर प्लांट लावू शकता. हे रोप अस्थमा, नाक बंद होणं यांसारख्या समस्या टाळते. ज्यामुळे हॅप्पी हॉर्मोन रिलिज होते.
स्नेक प्लांट स्नेक प्लांट घरातील एलर्जी कमी करते आणि यामुळे वातावरणात जाणवणाऱ्या समस्या टाळण्यास मदत होते. घरातील अतिरिक्त मॉईश्चर कमी होते आणि डोकेदुखीची समस्या टाळण्यास मदत होते आणि मूडही चांगला राहतो.