गर्ल डिनर, पनीर आईस्क्रीम हे पदार्थ तुम्ही २०२३ मध्ये खाल्ले का? पाहा २०२३ मध्ये कोणते पदार्थ व्हायरल झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2023 11:28 AM2023-12-15T11:28:48+5:302023-12-15T11:40:45+5:30

२०२३ यावर्षी गुगलवर कोणत्या पदार्थांच्या रेसिपी सर्वाधिक शोधल्या गेल्या याची यादी नुकतीच गुगलने प्रदर्शित केली होती. त्यात सगळ्यात जास्त शोधली गेलेली रेसिपी होती आंब्याचं लोणचं..

आता २०२३ यावर्षी कोणते खाद्यपदार्थ सर्वाधिक व्हायरल झाले याचीही यादी जाहिर करण्यात आली आहे. हे जे व्हायरल झालेले खाद्यपदार्थ आहेत, ते खूपच वेगळे असून त्यांची नावं आपण फारशी ऐकलेलीही नाहीत. पाककला क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग नेहमीच केले जातात. त्याच प्रयोगातून हे काही पदार्थ निर्माण झाले असून त्यांची नावंही खूपच भन्नाट आहेत... (Girl dinner, paneer ice cream and many more viral food recipies in the year 2023 )

theprintindia यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार मिलेट म्हणजेच बाजरीचे वेगवेगळे पदार्थ यावर्षी चांगलेच व्हायरल झाले होते. कारण २०२३ हे वर्ष मिलेट इयर म्हणून घोषित करण्यात आलं होतं. जी- २० परिषदेत पण या संकल्पनेचा खूप प्रचार आणि प्रसार झाला. त्यामुळे बाजरीच्या पारंपरिक रेसिपी वगळता इतर अनेक बाजरीचे खाद्यप्रयोग यावर्षी करण्यात आले.

पनीर आईस्क्रिम या पदार्थाची रेसिपीही यावर्षी बरीच व्हायरल झाली होती. अमेरिकेत पनीर आणि मध हे दोन पदार्थ एकत्र करून खातात. त्यालाच ते पनीर आईस्क्रिम म्हणतात. या दोन पदार्थांसोबतच वेगवेगळ्या पदार्थांचे टॉपिंग करून पनीर आईस्क्रिम ही डिश तयार करण्यात आली आहे.

गर्ल डिनर या पदार्थाचं नाव तुम्ही ऐकलंय का? हा पदार्थ म्हणजेच दुसरं तिसरं काही नसून एका प्लेटमध्ये ब्रेड, बटर, पनीर, द्राक्ष, लोणचं आणि वाईन हे पदार्थ घेणं आणि ते खाणं होय...

ऑलिव्ह ऑईलचा ग्राज़ा हा ब्रॅण्डही चांगलाच लोकप्रिय झाला होता. त्याचा वापर करून अनेक शेफनी वेगवेगळ्या रेसिपी केल्या.

पिस्ता या सुकामेव्याचा वापर करून दूध तयार करणे, पिस्ता फ्लेवरचं बटर तयार करणे असे अनेक खाद्यप्रयोगही यावर्षी गाजले.

फ्लेवर्ड वॉटर हा ट्रेण्डही यावर्षी चांगलाच लोकप्रिय ठरला. यात ‘unicorn candy’ or ‘mermaid हा फ्लेवर सर्वाधिक मागणीमध्ये होता. हा कोणत्याही प्रकारचा ज्यूस नाही. आपल्या साध्या पाण्यात फक्त इसेंन्स टाकून त्याला एक फ्लेवर दिला गेला आहे.

फळांना फ्रोजन करून किसायचं, त्यावर चीज किसून टाकायचं आणि वेगवेगळे ड्रायफ्रुट्स, कंडेन्स मिल्क, सुकामेवा टाकून ते खायचं, हा shaved fruits प्रयोगही चांगलाच गाजला.