म्हातारे होईपर्यंत फुफ्फुसं राहतील निरोगी; 'या' पद्धतीनं गूळ खा, सर्दी, खोकला छळणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 04:15 PM2022-12-13T16:15:30+5:302022-12-13T16:31:01+5:30

Gud Benefits in Winters : जर तुम्हाला असाच गूळ खायला आवडत नसेल तर तुम्ही गुळाचा चहा पिऊ शकता. गूळ, तूप आणि काळ्या मिरीच्या मिश्रणाचे लाडू बनवू खाऊ शकता. के

फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खाण्यापिण्याकडेही लक्ष द्यायला हवं. सेलेब्रिटी डायटिशिन आणि रायटर Luke Coutinho यांच्यामते प्रदूषण फुफ्फुसांवर नकाराकत्मक परिणाम करू शकतं.

यामुळे फुफ्फुसं आणि श्वासांचे गंभीर आजार उद्भवू शकता. फुफ्फुसांना इजा पोहोचल्यास श्वास घ्यायला त्रास होतो यामुळे अस्थमा, सीओपीडी, निमोनिया, फुफ्फुसांचा कॅन्सर, इन्फेक्शनसारखे गंभीर आजार होऊ शकतात.

गूळ एक नैसर्गिक स्विटनर आहे. रोज गुळाचे सेवन केल्यानं श्वासांचे गंभीर आजार टाळता येतात हे एक परिणामकारक टॉनिकसुद्धा आहे.

गूळ फुफ्फुस साफ करून ब्राँकायटिस, दमा आणि श्वासाच्या इतर विकारांपासून तुमचे रक्षण करू शकतो. यामुळेच कोळसा खाण किंवा धूळ-माती अशा ठिकाणी काम करणाऱ्यांना गूळ खायला दिला जातो.

गुळाच्या सेवनानं शरीर आतून गरम राहण्यास मदत होते.

एनर्जी लेव्हल वाढण्यास मदत होते.

रक्ताची कमतरता पूर्ण होते याशिवाय गॅसचा त्रास दूर होतो.

जर तुम्हाला असाच गूळ खायला आवडत नसेल तर तुम्ही गुळाचा चहा पिऊ शकता. गूळ, तूप आणि काळ्या मिरीच्या मिश्रणाचे लाडू बनवू खाऊ शकता. केमिकल फ्री गुळाचा वापर करा. जेणेकरून तब्येत चांगली राहण्यास मदत होईल.