गुढीपाडवा विशेष: मराठी नववर्ष स्पेशल ६ पारंपरिक पदार्थ; तुमच्या आवडीचा कोणता? वर्षाची गोड सुरुवात.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2024 12:00 PM 2024-04-06T12:00:28+5:30 2024-04-06T12:43:54+5:30
मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडव्याचा सण. आपली खाद्यसंस्कृती इतकी समृद्ध आहे की प्रत्येक सणाला वेगवेगळ्या पदार्थांचे महत्त्व असते.
गुढीपाडव्याच्या सणालाही काही खास पदार्थ आवर्जून केले जातात. ते पदार्थ कोणते ते पहा आणि तुमची त्या पदार्थांची तयारी झाली आहे की नाही हे देखील यानिमित्ताने एकदा तपासून घ्या.
एरवी आपल्याकडे सणासुदीला पुरणपोळीचा मान असतो. पण गुढीपाडव्याच्या दिवशी मात्र गोड पदार्थांमध्ये वर्णी लागते ती श्रीखंडाची.
आता श्रीखंड केले म्हणजे त्याच्यासोबत पुरी आलीच. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड- पुरीचा बेत असतो.
कडुलिंबाच्या फुलांची- पानांची चटणी हा एक पारंपरिक पदार्थ या दिवशी हमखास केलाच जातो. या दिवशी ही चटणी चाखली की पुढे वर्षभर आपण निरोगी राहतो असं मानलं जातं.
या दिवसात कैरी भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे कैरीचं पन्हं देखील गुढीपाडव्याला केलं जातं.
कैरीच्या पन्हाप्रमाणेच कैरी घालून केलेल्या वाटल्या डाळीचे महत्त्वही गुढीपाडव्याला असते.
साखरेच्या गाठीही याच सणाच्या काळात पाहायला मिळतात. गुढीलाही साखरेची गाठी घातली जाते. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ही गाठी घातलेले पाणी प्यावे, असं म्हणतात.