Gudi Padwa 2023 Rangoli Designs : 10 Easy Rangoli Designs to Draw at Doorstep on Gudi Padwa...
Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्याला दारासमोर काढता येतील अशा १० सोप्या रांगोळी डिझाईन्स... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2023 12:44 PM2023-03-21T12:44:45+5:302023-03-21T12:55:02+5:30Join usJoin usNext Gudi Padwa Rangoli Designs गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस. राज्यात सगळीकडे दारात गुढी उभारत हा सण अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा करतात. या आनंदाच्या क्षणी दारात रांगोळी तर हवीच. पाहूयात पाडव्याला दारात काढता येतील अशा १० रांगोली डिझाईन्स (Gudi Padwa Rangoli Designs).. गुढी हे पाडव्याचे महत्त्वाचे प्रतिक असल्याने दारात गुढीची रांगोळी काढण्याची रीत आहे. विविध रंगांचा वापर करुन आपण ही गुढी काढू शकतो. अगदी सोप्या पद्धतीनेही ही रांगोळी काढता येऊ शकते. घराबाहेर थोडी मोठी जागा असेल तर अशी थोडी मोठी रांगोळी काढता येऊ शकते. यामध्ये गडद रंग वापरल्यास ही रांगोळी जास्त उठून दिसते. तुमच्या हातात कला असेल आणि तुम्हाला नाजूक रांगोळी काढता येत असेल तर गुढीच्या बाजुने अशी नक्षी काढल्यास त्या गुढीला छान गेट अप येतो आणि ही नक्षीदार रांगोळी फार छान दिसते. पाडव्याच्या सणाला फुलं, आंब्याची पानं, कडूनिंबाची पानं यांना विशेष महत्त्व असतं. रांगोळीत आपण या सगळ्याचा समावेश केल्यास संस्कृती आणि परंपरेचे दर्शन या रांगोळीतून दिसून येते. घरासमोर एखादा कोपरा असेल आणि तिथे तुम्हाला पाडव्याच्या शुभेच्छा देणारी रांगोळी काढायची असेल तर तुम्ही अशाप्रकारची रांगोळी काढू शकता. एखादा गडद रंगाची चादर काढून त्यावर घरी येणाऱ्या सर्वांना शुभेच्छा या रांगोळीतून आपण देऊ शकतो. ठसठशीत आणि छान उठून दिसणारी रांगोळी काढली तर ती पटकन डोळ्यात भरते. त्यामुळे थोडे मोठमोठे आकार काढून आपण घरासमोर अशी रांगोळी काढू शकतो. अशी रांगोळी झटपट काढून होते आणि दिसायलाही छान दिसते.टॅग्स :सोशल व्हायरलरांगोळीगुढीपाडवाSocial Viralrangoligudhi padwa