गुढी पाडव्याला सौंदर्य वाढवतील १० खास मराठमोळे दागिने; अभिमानाने अंगाखाद्यावर मिरवायला हवे हे सुंदर साज By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 11:34 AM 2023-03-17T11:34:00+5:30 2023-03-17T13:33:02+5:30
Gudi Padwa 2023 : महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात यादिवशी गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. यावेळी महिला नऊवारी किंवा सहावारी साडीवर शोभून दिसणारे मराठी अस्सल दागिने. (Gudi Padwa Special Marathi Look Ideas) गुढी पाडव्याला अवघे काही दिवसच शिल्लक राहीले आहेत. पाडव्यासाठी नवीन साड्या, दागिने अशी खरेदीची लगबग सुरू असणार. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात यादिवशी गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. यावेळी महिला नववारी किंवा सहावारी पारंपारीक साडी नेसून उत्सव साजरा करतात. (Gudi Padwa Special Marathi Look Ideas)
सध्या आर्टिफिशल ज्वलेरीची क्रेझ तरूणींमध्ये आहे. नववारी किंवा सहावारी साडीवरही शोभून दिसतील असे दागिने कमीत कमी किमतीत तुम्ही बाजारातून किंवा ऑनलाईन घेऊ शकता.
आर्टिफिशल दागिने म्हटलं की पैसे वाया जातील, काळे पडतील अशी भिती असते. पण नवीन डिजाईन्ससह सध्या येणारी ज्वेलरी टिकायलाही चांगली आहे. फक्त वापर झाल्यानंतर वर न ठेवता ही ज्वेलरी तुम्ही व्यवस्थित बॉक्समध्ये ठेवायला हवी.
जर गळ्यात जास्त जड काही घालायला आवडत नसेल तर तुम्ही नथ आणि पारंपारीक ठुशी त्यावर साजेसे गोल्डन किंवा मोत्याचे कानातले घालू शकता.
हाता साडीच्या रंगाच्या बांगड्या किंवा गोल्डन, ऑक्साईडचे तोडे, कडे, पाटल्या शोभून दिसतील.
चिंचपेटी या प्रकारात तुम्हाला बरेच ऑपश्नस पाहायला मिळतील. १०० रुपयांपासून ते २००० हजार रुपयांपर्यंत आपल्याला आवडतील तसे हव्या त्या डिजाईनचे नेकपिस तुम्ही घेऊ शकता.
कानात भिकबाळी, बुगडी घातल्यास साडीचा लूक अधिक खुलून येईल.
नवावारी साडीवर कोल्हापूरी साज किंवा टेंम्पल ज्वेलरीसुद्धा गुढीपाडव्याला ट्राय करू शकता.
कानांतल्यांवर मॅचिंग असणारा हार गळ्याची शोभा वाढवेल. यावर साजेश्या बांगड्याची निवड तुम्ही करा.
(Image Credit - Social Media)