Hair Fall Solution : केस गळणं दिवसेंदिवस जास्त वाढतंय? रोज ही ३ तेलं लावा, केस कायम दाट, लांबसडक राहतील By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 10:16 AM 2022-10-06T10:16:55+5:30 2022-10-06T10:41:35+5:30
Hair Fall Solution : जास्वंदाचं तेल लावल्याने केस गळणे थांबते. या तेलाचा केसांवर इतका चमत्कारिक प्रभाव पडतो की काही दिवस ते लावल्यानंतर नवीन केस येऊ लागतात. केस गळणे (Hair Fall) ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनियमित आहार आणि केसांची योग्य काळजी न घेतल्याने वयाच्या आधीच केस गळण्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे. (How to stop hair fall) दाट केस आपले सौंदर्य वाढवतात. अशा परिस्थितीत जर केस खूप गळत असतील तर त्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही केसांच्या तेलांबद्दल सांगत आहोत, जे लावल्याने केस मुळापासून मजबूत होतील आणि गळणे कमी होईल. (Tips hair oils to stop hair fall loss and grow new hair home remedies)
जास्वंदाचं तेल जास्वंदाचं तेल लावल्याने केस गळणे थांबते. या तेलाचा केसांवर इतका चमत्कारिक प्रभाव पडतो की काही दिवस ते लावल्यानंतर नवीन केस येऊ लागतात. ते बनवण्यासाठी एका भांड्यात खोबरेल तेल गरम करा. त्यात जास्वंद बारीक करून टाका आणि थोडा वेळ गरम करा. यानंतर हे मिश्रण थंड झाल्यावर स्वच्छ बाटलीत भरून ठेवा. केस धुण्यापूर्वी या तेलाने एकदा मसाज करा.
मेथीचं तेल हे तेल लावल्याने केसगळतीच्या समस्येपासून सुटका मिळेल. ते बनवण्यासाठी एका भांड्यात मोहरीचे तेल गरम करा. नंतर त्यात सुकी मेथी दाणे, थोडी कढीपत्ता घालून हे मिश्रण चांगले मिक्स करून शिजवा. हे मिश्रण थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवा. या तेलाचा वापर केल्याने कोंडा आणि खाज येण्याची समस्याही केसांपासून दूर होते.
कांद्याचं तेल कांद्याचा रस केसांना मजबूत करण्यासाठी ओळखला जातो. कांद्याचे तेल बनवण्यासाठी प्रथम कांदा सोलून त्याचा रस काढा. त्यानंतर खोबरेल तेल गरम करून त्यात कांद्याचा रस घालून थोडा वेळ शिजवून घ्या. यानंतर, तेल पूर्णपणे थंड झाल्यावर ते बाहेर काढा आणि बाटलीमध्ये भरा. केस धुण्याच्या एक दिवस आधी हे तेल लावा.