Haldi Kumkum 2025 : हळदी कुंकवासाठी घ्या २० रुपयांत आकर्षक वस्तू, पाहा पर्याय-वाण लुटा मनसोक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 16:00 IST2025-01-11T15:26:18+5:302025-01-11T16:00:57+5:30
Haldi Kumkum 2025 : कमी खर्चात रोजच्या वापरात उपयोगी येतील असे वाण पाहूया. हे वाणांचे पर्याय पाहून हळदी कुंकवासाठी घरी आलेल्या महिला खूश होतील.

हळदी कुंकवाची (Haldi Kumkum) लगबग प्रत्येकाच्या घरी सुरू असते. मकर संक्रांतीनंतर (Makar Sankranti) हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची सुरूवात होते. तुम्ही हळदी कुंकवासाठी आपल्या आवडीनुसार वाणांची खरेदी करू शकता. (Haldi Kumkum Vaan Ideas)
कमी खर्चात रोजच्या वापरात उपयोगी येतील असे वाण पाहूया. हे वाणांचे पर्याय पाहून हळदी कुंकवासाठी घरी आलेल्या महिला खूश होतील.
टिकली
तुम्ही गोल टिकली, चंद्रकोर, चौकोनी, खड्यांची अशा वेगवेगळ्या टिकल्यांचे पाकीट हळदी कुंकवासाठी आलेल्या महिलांना देऊ शकता.
साबणाचे खोके
साबणाचे खोके अंघोळीचे साबण, भांडी घासण्याचे साबण असे रोजच्या वापरातले साबण ठेवण्यासाठी कामात येतात.
हळदी कुंकवाचा करंडा
हळदी कुंकवाचा प्लास्टीकचा करंडा तुम्ही हळदी कुंकवासाठी देऊ शकता.
प्लास्टीकचे डबे
प्लास्टीचे डबे तुम्हाला १५ ते २० रूपयांत सहज मिळतील. चांगल्या रंगाचे, चांगल्या क्वालिटीचे छोटे प्लास्टीकचे छोटे डबे महिलांना देऊ शकता.
मेहेंदीचे कोन
मेहेंदी काढायला प्रत्येकालाच आवडते. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी तुम्ही महिलांना मेहेंदीचे कोन देऊ शकता.
कापडी पिशवी
आजकाल प्लास्टीकच्या पिशव्या कोणतीही वापरत नाही. कापडाची पिशवी ही उपयोगाची वस्तू म्हणून तुम्ही हळदी कुंकवासाठी आलेल्या महिलांना देऊ शकता.
दिवे
बाजारात दिव्यांचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. या दिव्यांचा वापर खास सण-उत्सवांच्या दिवसांत केला जातो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दिव्यांची निवड करू शकता. २० रूपयांत तुम्हाला १ ते २ दिवे सहज मिळतील.
मोबाईल कव्हर
कापडाचे मोबाईल कव्हर किंवा साडी पासून बनलेले मोबाईल कव्हर बरेच ट्रेंडीग आहे. हे कव्हर तुम्ही कोणत्याही फोनसाठी वापरू शकता.