मकर संक्रात स्पेशल : वाण द्यायला वस्तू निवडताय? १० रुपयांपासून ९० रुपयांपर्यंत पाहा भन्नाट ऑप्शन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 04:29 PM2023-01-11T16:29:31+5:302023-01-11T18:54:33+5:30

Haldi Kumkum ceremony gift idea : यंदा काय खास वाण द्यायचं, वस्तू उत्तम आणि बजेटमध्ये असा शोध घेत असाल तर या घ्या आयडिया.

मकर संक्रातीनंतर (Makar Sankrati) घराघरांतील महिला हळदी कुंकू करतात. हळदी कुकूंवाचं खास आकर्षण असतं ते म्हणजे महिलांचे नवनवीन पांरपारीक लूक्स आणि वाण. छान नटून थटून महिला एकमेकींच्या घरी हळदी कुकूंवाला जातात. कमीत कमी खर्चात कोणतं बेस्ट वाण देता येईल असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. १० रूपयांपासून ९० रुपयांपर्यंत कोणते नवनवीन वाण देता येतील ते समजून घेऊया. (Haldi Kumkum ceremony gift idea van for haldi kumkum)

साडीच्या निऱ्यांना लावण्यासाठी पीनांच्या खड्यांच्या डिजाईन्स तुम्हाला २० रूपयांपासून ते ५० रूपयांपर्यत मिळतील

गोल ब्राऊन टिकली किंवा चंद्रकोर सर्वांना लावायला आवडते. हळदी कुंकवासाठी तुम्ही २० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत टिकल्यांचे पाकीट घेऊ शकता

केसांच्या आंबाड्याला लावण्यासाठी तुम्ही हेअर ब्रॉच विकत घेऊ शकता.

कोणत्याही सण उत्सवांमध्ये काठापदराच्या साडीवर घालण्यासाठी तुम्ही सिल्वर नथ वाण म्हणून देऊ शकता.

साड्या किंवा कोणतेही कपडे कापटात ठेवण्यासाठी कव्हर तुम्ही महिलाना हळदी कुंकूवासाठी देऊ शकता.

अडजस्टेबल अंगठ्या तुम्ही हळदी कुंकवाचं वाण म्हणून देऊ शकता.

आकर्षक कापडाच्या किंवा कागदाच्या कापडी पिशव्या तुम्ही वाण म्हणून देऊ शकता.

प्लास्टीकच्या पाणी पिण्याच्या बॉटल्स तुम्हाला २० ते १०० रूपयांपर्यंत बाजारात मिळतील

हात रुमाल घेतल्याशिवाय कोणीही घराबाहेर पडत नाही. ही रोज लागणारी वस्तू तुम्ही हळदी कुंकवासाठी आलेल्या बायकांना देऊ शकता.

वस्तू, ज्वेलरी ठेवण्यासाठी तुम्ही कापडाचे पाऊच विकत घेऊ शकता