Teddy Day : गुबगुबीत-सुंदर टेडी बेअर गिफ्ट करताय? महागडे टेडी विकत घेण्यापूर्वी हे वाचा.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2023 02:54 PM 2023-02-10T14:54:44+5:30 2023-02-10T16:04:45+5:30
Happy Teddy Day Valentine Week Special : टेडी बिअर गिफ्ट करण्याचे कारण काय... व्हॅलेंटाईन वीक म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा आठवडा. यामध्ये रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, किस डे, हग डे यांप्रमाणेच टेडी डे हा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा दिवस (Happy Teddy Day Valentine Week Special).
या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रेमाचे प्रतिक म्हणून छानसा टेडी गिफ्ट देण्याची पद्धत आहे. चॉकलेट किंवा गुलाब ही जशी प्रेमाची प्रतिके आहेत तसाटेडी हाही प्रेमाचे प्रतिक असून या दिवशी आवर्जून एकमेकांना टेडी दिला जातो.
यातही वेगवेगळ्या आकाराचे, प्रेमाचे संदेश लिहीलेले असे आकर्षक टेडी बाजारात उपलब्ध असतात. विशेषत्त्वाने मुले मुलींना टेडी गिफ्ट म्हणून देतात.
अमेरीकेमध्ये टेडी बिअर या संकल्पनेचा उगम झाला. तेव्हापासून नंतर जगभरात हळूहळू लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच टेडी बिअर ही संकल्पना प्रसिद्ध झाली.
सॉफ्ट टॉय म्हणजेच मऊ गुबगुबीत असणारे हे टेडीबियर तरुणींना प्रामुख्याने आवडते. त्याचे आकर्षक रंग, डोळ्यातील भाव तरुणींना आकर्षित करणारे असल्याने आपल्या आवडत्या व्यक्तीने टेडी बिअर दिला तर तरुणी विशेष खूष होतात.
टेडीमध्येही गुलाबी, लाल, पांढरा या रंगाच्या टेडींना सर्वाधिक मागणी असते. याचे कारण म्हणजे हे टेडी समोरच्या व्यक्तीचे आपल्यावर प्रेम असल्याचे दर्शवतात.
त्यामुळे तुम्हीही टेडी देण्याचा विचार करत असाल तर टेडीचे किचन, उशी, सॅक किंवा एखादा छानसा शो पिस असे बरेच पर्याय बाजारात वेगवगेळ्या किमतींना उपलब्ध आहेत हे लक्षात ठेवा.