व्हॅलेनटाइन्स डेला करणार हार्दिक पांड्या लग्न, मात्र पुन्हा लग्न करण्याचं नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 13:16 IST2023-02-12T15:32:07+5:302023-02-13T13:16:08+5:30
Hardik pandya and natasha stankovic to remarry on valentines day in udaipur : आधी त्यांनी कोर्टात लग्न केले होते त्यावेळी खूपच घाई झाली. त्यांचे लग्न थाटामाटात करण्याची कल्पना तेव्हापासूनच त्यांच्या मनात होती. ते दोघंही याबद्दल खूप उत्सुक होते.

लग्नाच्या ३ वर्षानंतर भारतीय क्रिकेटर हार्दीक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक पांड्या पुन्हा एकदा लग्न करणार आहेत.(Hardik pandya and natasha stankovic to remarry on valentines day in udaipur)
व्हॅलेनटाईन्स डे च्या दिवशी उदयपूरमध्ये हा खास सोहळा संपन्न होणार आहे.
आधी त्यांनी कोर्टात लग्न केले होते त्यावेळी खूपच घाई झाली. त्यांचे लग्न थाटामाटात करण्याची कल्पना तेव्हापासूनच त्यांच्या मनात होती. ते दोघंही याबद्दल खूप उत्सुक होते.
हा विवाह सोहळा 13 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि 16 पर्यंत चालेल. हा विवाहपूर्व उत्सव जसे की हळदी, मेहंदी यांसारख्या प्रथांसह लग्न असेल.
याची तयारी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून सुरू झाली होती.
हार्दिक आणि नतासा, 30, 31 मे 2020 रोजी एका जिव्हाळ्याच्या विवाहबंधनात अडकले
या जोडप्याला जुलै 2020 मध्ये त्यांचा मुलगा अगस्त्य झाला.
आता त्यांच्या दुसऱ्या लग्नाला काय काय गमती होणार, याचे फोटो पाहण्यासाठी नेटिझन्स उत्सुक आहेत.