चेहऱ्यावर प्रचंड पिंपल्स आलेत? ४ सोपे उपाय, पिंपल्स होतील कमी आणि चेहरा सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2022 06:19 PM2022-11-24T18:19:00+5:302022-11-24T18:23:46+5:30

Skin Problems घरगुती गोष्टींचा वापर करुन आपण पिंपल्सचा त्रास कमी करु शकतो. सोबत हवी हेल्दी लाइफस्टाइल

बदलत्या ऋतूमध्ये अनेकांना स्किनच्या संबंधित प्रॉब्लेम्स उद्भवतात. चेहऱ्यावर मुरूम, पिंपल्स, डार्क स्पॉट अशा विविध प्रकारच्या समस्या उद्भवतात. पिंपल्सचे आतील पाणी जर फुटून बाहेर पडले, तर चेहऱ्यावरील इतर ठिकाणी पिंपल्स लवकर तयार होतात. त्यामुळे चुकूनही कधी पिंपल्स फोडण्याची चूक करू नका. घरगुती साहित्यांचा वापर करून आपण पिंपल्सचा त्रास कमी करू शकतो.

कोलगेट फक्त दात घासण्यासाठी नाही तर, पिंपल्सला घालवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. पिंपल्सवर कोलगेट लावल्याने पिंपल्समधील घाण निघून जाते. जर चेहऱ्याच्या संबंधित आपण डॉक्टरांकडून उपचार घेत असाल, तर त्यांना विचारूनच या रेमिडीचा वापर करावा.

हळदीमध्ये अनेक ॲण्टी बॅक्टेरियल गुण आहेत. जे आपल्या शरीरासाठी खुप फायदेशीर आहे. हळदीचे फायदे अनेक आहेत. चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी हळदी मदतगार ठरेल. हळदीत गुलाबजल मिसळा. हे मिश्रण पिंपल्सवर लावा. आणि धुवून टाका.

टी ट्री ओईल चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. ॲलोवेरा जेलमध्ये टी ट्री ऑइल मिसळा. आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. या मिश्रणाचा नियमित वापर करा. जेणेकरून पिंपल्सपासून लवकर सुटका मिळेल.

खोबरेल तेल पिंपल्स घालवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यामधील असलेले अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन-ई त्वचेवरील पिंपल्स दूर करतात. रात्री झोपताना पिंपल्सवर खोबरेल तेल लावा आणि सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवून टाका. खोबरेल तेल चेहरा स्वच्छ करण्यास मदत करते.

ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये ॲण्टी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत. जे पिंपल्सपासून सुटका करण्यास मदत करतात. कापसाच्या मदतीने ॲपल सायडर व्हिनेगर पिंपल्सवर लावा. त्यानंतर १० ते १५ मिनिटं पाण्याने धुवून घ्या. अश्याने पिंपल्स कमी होते आणि निघून जाते.