Health Tips: 5 Food items that reduces muscle pain and body pain, Home remedies for muscle pain
सारखी अंगदुखी, मसल्स पेनमुळे वैतागलात? ५ पदार्थ नियमित खा, स्नायूंचा थकवा कमी होईल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2022 03:19 PM2022-12-15T15:19:28+5:302022-12-15T15:24:19+5:30Join usJoin usNext १. काम खूप झालं किंवा खूप थकवा आला तर स्नायूंमध्ये वेदना होण्याचा म्हणजेच मसल्स पेन किंवा अंगदुखीचा त्रास अनेकांना होतो. थंडीमध्ये काही जणांचा हा त्रास तर जास्तच वाढतो. त्यासाठीच बघा हे काही खास उपाय. २. कधी कधी व्यायाम करताना एखादा स्नायू दुखावला जातो. किंवा कधी कधी मार लागल्याने, पडल्यामुळेही अंगदुखीचा त्रास होतो. असा त्रास कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने पेन किलर तर घ्याच किंवा एखादा मलम लावून मसाजही करा. पण त्यासोबतच आहारातही या काही पदार्थांचं प्रमाण वाढवून बघा. हा उपाय अभिनव महाजन यांनी एचटी लाईफस्टाईलशी बोलताना शेअर केला आहे. ३. आहारतज्ज्ञांनी सांगितलेला सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे पालक. एक कप पालक घेतला तर त्यात साधारण ५ ग्रॅम प्रोटीन्स असतात. शिवाय त्यात अनेक ॲण्टी इन्फ्लामेटरी घटक, व्हिटॅमिन ए, बी आणि सी देखील असतं. त्यामुळे अंगदुखीसाठी तर खा, पण पोस्ट वर्कआऊट फूडमध्येही पालकाचा समावेश करा. ४. मसल्स रिकव्हरीसाठी टरबूज देखील अतिशय उत्तम आहे. यात जवळपास ९२ टक्के पाणी असतं. त्यामुळे शरीर हायड्रेटेड ठेवायला तर मदत होतेच. पण त्यातील ॲण्टी इन्फ्लामेटरी घटक आणि महत्त्वाचे व्हिटॅमिन्स, खनिजे स्नायूंचा थकवा दूर करण्यासाठीही मदत करतात. ५. केळीमधून लोह, फायबर, पोटॅशियम, फोलेट, ॲण्टीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर मिळतं. हे सगळेच घटक स्नायूंच्या मजबूतीसाठी उपयुक्त मानले जातात. ६. लिंबू, संत्री, मोसंबी, डाळिंब, किवी अशा सायट्रस फळांमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे स्नायूंचा थकवा घालविण्यासाठी ही फळं नियमित खावीत. ७. एरवी आपल्या रोजच्या जेवणात हळद असतेच. पण स्नायूंचा थकवा घालविण्यासाठी दूध- हळद घेणे उत्तम ठरते. दुधात चिमूटभर हळद टाकून ते उकळावे आणि गरम गरम दूध प्यावे. हळदीमध्ये असणारे ॲण्टी इन्फ्लेमेटरी आणि ॲण्टीसेप्टिक घटक अंगदुखी लवकर कमी करण्यासाठी मदत करतात. टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सफळेअन्नHealthHealth Tipsfruitsfood