Healthy Long Life Tips : निरोगी दीर्घायुष्याचे सिक्रेट आहेत ५ व्यायाम; रोज घरी करा, तब्येत राहील ठणठणीत By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 01:37 PM 2022-11-06T13:37:43+5:30 2022-11-06T13:56:04+5:30
Healthy Long Life Tips : जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, जे लोक नियमितपणे सायकल चालवतात ते दीर्घ आणि निरोगी आयुष्याचा आनंद घेतात वाढत्या वयात आपली तब्येत चांगली राहावी. निरोगी दीर्घायुष्य मिळावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी निरोगी जीवनशैली अत्यंत महत्त्वाची आहे. निरोगी आणि दीर्घायुष्य जगायचे असेल तर निरोगी जीवनशैलीच्या सवयी पाळल्या पाहिजेत. फिटनेस विशेषज्ज्ञ पर्वतारोही कमल कौर यांनी हेल्थ शॉट्सला याबाबत अधिक माहिती दिली आहे. निरोगी राहण्यासाठी ५ बेस्ट व्यायाम प्रकार यांनी सांगितले आहेत. (Healthy Long Life Tips Try these 5 exercises for long living)
नियमित चालण्याची सवय ठेवा अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या एपिडेमियोलॉजी, प्रिव्हेन्शन, लाइफस्टाइल आणि कार्डिओमेटाबॉलिक हेल्थ कॉन्फरन्स 2021 मध्ये सादर केलेल्या संशोधन परिणामांनुसार, चालणे हा निरोगी राहण्याचा सर्वात सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे. यामुळे हृदयही निरोगी राहते. हे नक्कीच जास्त काळ जगण्यास मदत करू शकते. जर तुमच्याकडे चालण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही घरातील रोजची कामे करताना चालू शकता. चालण्याने हृदयाला फायदा होतो. इतर आजारांबरोबरच मधुमेह आणि कर्करोगाचा धोका कमी आहे.
धावणं धावणे हे जीवनासाठी खरोखर आवश्यक आहे. ब्रिटीश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की कितीही धावणे हृदयविकार आणि सर्व प्रकारच्या कर्करोगामुळे उद्भवणारा मृत्यूचा धोका कमी करते.
एरोबिक्स एरोबिक्स वजन कमी करण्यात फायदेशीर ठरते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे आणि हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देणे या फायद्यांचा समावेश आहे. न्यूरोलॉजीमध्ये प्रकाशित झाल्यानुसार नियमित एरोबिक व्यायामामुळे मानसिक आरोग्यास फायदा होऊन तुमची जीवन गुणवत्ता वाढू शकते.
सायकलिंग जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, जे लोक नियमितपणे सायकल चालवतात ते दीर्घ आणि निरोगी आयुष्याचा आनंद घेतात. तुमचीही निरोगी दीर्घायुष्याची इच्छा असेल तर तुम्ही स्वत:ला सायकल चालवण्याची सवय लावू शकता. शरीरातील चरबी कमी करण्याचा, वजन कमी करण्याचा आणि एकूणच फिटनेसचा स्तर वाढवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
स्विमिंग जर तुम्हाला दीर्घायुष्य जगायचे असेल तर पोहणे आवश्यक आहे. हे तुमचे संपूर्ण शरीर सक्रिय करते. शरीर अधिक लवचिक आणि मजबूत बनवते. हे तुमची स्नायूंची ताकद आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी फिटनेस देखील वाढवते. खरं तर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर पोहणे तुम्हाला तुमचे वजन कमी करण्याचे ध्येय गाठण्यात मदत करू शकते. पोहणे फुफ्फुस आणि हृदय मजबूत करते.