Heavy blouse with plain saree : लग्नासाठी साधी साडी निवडताय? ट्राय करा हेवी डिजाईन्सचे ब्लाऊज, एकापेक्षा एक 'वॉव पॅटर्न्स’ ब्लाऊज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 11:35 PM2021-12-17T23:35:34+5:302021-12-19T12:38:22+5:30

Heavy blouse with plain saree : हेवी वर्क ब्लाऊजची शिलाई जास्त असली तरी त्यामुळे तुमचं सौंदर्य खुलतं ते काही वेगळंच.

सध्या प्लेन साड्यांवर हेवी वर्कचे ब्लाऊज घालण्याची फॅशन दिसून येतेय. लग्नाला भरजरी साड्या नेसण्यापेक्षा आजकाल मुली साध्या साड्यांवर हेवी वर्कचे ब्लाऊज घालणं पसंत करतात. (Latest Heavy Blouse patterns) (Image Credit- etsy.com/)

नेहमीच महागड्या साड्यांवर खर्च करण्यापेक्षा तुम्ही कधी ब्लाऊजवरही खर्च करून पाहायला हवा. हेवी वर्क ब्लाऊजची शिलाई जास्त असली तरी त्यामुळे तुमचं सौंदर्य खुलतं ते काही वेगळंच. (Image Credit- Social Media)

तुम्ही थ्री फोर स्लिव्हजचं ब्लाऊज घालणार असाल तर त्यावर छानसं वर्क करून घ्या. साडीच्या रंगानुसार वेगवेगळ्या लेस किंवा मण्यांचा, स्टोन्सचा वापर तुम्ही करू शकता. (Image Credit- pinterest )

साडीपेक्षा ब्लाऊज जास्त लक्ष वेधून घेत असते. त्यामुळे तुम्ही हे ब्लाऊज जास्तीत जास्त कसं सुंदर दिसेल याचा विचार करा. (Image Credit- Social Media)

साडीच्या ब्लाऊज पीसचा उपयोग करुन तुम्हाला कटवर्क करता येऊ शकते. फुलांच्या, पक्ष्यांच्या अशा वेगवेगळ्या आकारात तुम्हाला कटवर्क करता येतात. (Image Credit- Social Media)

वेलवेट ब्लाऊजही तुम्ही ट्राय करू शकता. बाजारात तुम्हाला साडीवर साजेसे वेलवेटचे ब्लाऊज उपलब्ध होतील. (Image Credit- Social Media)

गोंड्याची फॅशन अजूनही जुनी झालेली नाही. तुम्ही तुमच्या ब्लाऊजला गोंडे लावून घेऊ शकता.

ब्लाऊजवर राधा क्रिष्णाची डिजाईनही तुम्ही तयार करून घेऊ शकता.

ऑफ शोल्डर ब्लाऊजही साड्यांवर उठून दिसतं.

थ्रेड वर्क केलेले ब्लाऊजही लूक खुलवतात. त्यामुळे तुम्हाला तसे काही ट्राय करायलाही हरकत नाही.

पुढून प्लेन आणि हातांवर हेवी वर्क असा पॅटर्नसुद्धा उत्तम वाटतो. (Image Credit- tipsandbeauty.com)

अशा प्रकारचे ब्लाऊज स्वत:च्या लग्नाला किंवा घरातील खास व्यक्तीच्या लग्नासाठी तुम्ही शिवून घेऊ शकता.

ब्लाऊजच्या कडांना वेगवेगळ्या रंगाचे फुलांचे वर्कसुद्धा उठून दिसते. साडीच्या रंगानुसार तुम्ही फुलं लावू शकता

ब्लाऊजवर आकर्षक प्रिंट असेल तर तुम्हाला जास्त वर्क करून घेण्याची गरज भासणार नाही.