भरपूर प्रोटीन हवं म्हणून महागड्या गोष्टी कशाला? नाश्त्याला खा ५ व्हेज पदार्थ, प्रोटीनचा खजिना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 11:40 AM2023-08-14T11:40:03+5:302023-08-14T14:54:34+5:30

High Protein Breakfast Ides : मोड आलेली कडधान्य फायबर्स आणि प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत असतात.

रोजच्या धावपळीत लोक नाश्ता न करतात घराबाहेर पडतात की त्यांची सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. नाश्ता केल्यानं संपूर्ण दिवस शरीर एर्नेजेटिक राहतं. इतकंच नाही तर नाश्त्याला पौष्टीक पदार्थांची निवड केल्यास प्रोटीन्स, हेल्दी फॅट्स, फायबर, व्हिटामीन्स, मिनरल्स मिळतात.

प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीरात कमकुवतपणा जाणवू शकतो. शाकाहारी लोकांचा असा समज असतो की त्यांना प्रोटीन्सयुक्त पदार्थांचे खूप कमी पर्याय आहेत. पण असे अनेक व्हेजिटेरियन पदार्थ आहेत ज्याच्या सेवनानं शरीराला भरभरून प्रोटीन मिळते. दिवसाची सुरूवात प्रोटीन्सयुक्त नाश्त्याने केल्यास पूर्ण दिवस उत्साही वाटते आणि थकवा जाणवत नाही.

सकाळच्या नाश्त्याला शेंगदाणे घालून पोहे खा. यामुळे फायबर्स आणि प्रोटीन्स मिळतील. पोहे खाल्ल्यामुळे लवकर भूकही लागत नाही. बराचवेळ पोट भरल्यासारखं वाटतं.

सकाळी रिकाम्या पोटी सिड्सचे सेवन करा. यात तुम्ही बदाम, सुर्यफुलाच्या बीया, चिया सिड्स घालून खाऊ शकता. यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते याशिवाय स्मरणशक्तीही चांगली राहते.

बेटर हेल्थ चॅनलनुसार शेंगा आणि डाळींमध्ये बऱ्याचप्रमाणात प्रोटीन असते. मूगाच्या डाळीचा चिला बनवून नाश्त्याला खाल्ल्याने शरीर हेल्दी राहण्यास मदत होते. यात पोटॅशियम, कार्ब्स, व्हिटामीन सी, आयर्न, कॅल्शियमसुद्धा असते.

व्हेजिटेरियन फूड्समध्ये सोयाबीन हा एक उत्तम पदार्थ आहे. यामुळे कमकुवत शरीरालाही प्रोटीन्स मिळतात. तुम्ही नाश्त्याला सोयाबीन चाट खाऊ शकता. यामुळे संपूर्ण दिवसभराची प्रोटीन्सची कमकरता दूर होईल.

मोड आलेली कडधान्य फायबर्स आणि प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत असतात. याव्यतिरिक्त हा एक पौष्टीक नाश्ता आहे. यामुळे शरीराला व्हिटामीन्स आणि मिनरल्स मिळतात. वजन कमी करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

दलियामध्ये डाएटरी फायबर्स असतात. याच्या सेवनानं शरीराला उर्जा मिळते आणि वजन नियंत्रणात राहते. नियमित याचे सेवन केल्यानं पचनक्रिया चांगली राहते. याशिवाय पचनाची समस्या कमी होते.