मुंग्या-पाली-झुरळं-माशा पळवून लावणारे ६ घरगुती उपाय- विकतच्या किटकनाशकांची गरजच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2025 18:32 IST2025-04-16T17:43:49+5:302025-04-16T18:32:48+5:30

कधी घरात मुंग्यांचा उच्छाद असतो तर कधी भिंतीवर इकडून तिकडे पळणाऱ्या पाली पाहून वैताग येतो. डास आणि झुरळांचा त्रास तर नेहमीचाच असतो..
तुमच्या घरातला हा त्रास कमी करण्यासाठी आता कोणते अतिशय प्रभावी ठरणारे घरगुती उपाय करता येतील ते पाहूया.. हे उपाय केल्याने डास, मुंग्या, पाली, झुरळं, उंदीर घरातून पळून जातील आणि तुमचं घर स्वच्छ राहील.
घरात मुंग्या झाल्या असतील तर साखर आणि बोरॅक्स पावडर एकत्र करून घरात वेगवेगळ्या ठिकाणी शिंपडा. मुंग्या कमी होतील.
फळांच्या टोपलीवर माशा घोंगावत असतात. त्यांना पळवून लावण्यासाठी व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात घेऊन ते फळांवर आणि टोपलीवर शिंपडून ठेवा.. माशा कमी होतील.
लवंग तेल आणि लॅवेंडर ऑईल देखील माश्यांना पळवून लावण्यासाठी उपयुक्त ठरतं.
घरात खूप पाली झाल्या असतील तर लसणाच्या पाकळ्या आणि मिरेपूड पाण्यात घाला आणि ते पाणी जिथे जिथे पाली जास्त प्रमाणात फिरताना दिसतात तिथे शिंपडून टाका. पाली कमी होतील.
झुरळांना पळवून लावण्यासाठी व्हिनेगर आणि पेपर मिंट ऑईल यांचं मिश्रण उपयुक्त ठरतं.
घरात उंदीर झाले असतील तर पेपरमिंट सोप, मिरे आणि पाणी एकत्र कालवून जिथे उंदीर जास्त प्रमाणात येतात तिथे टाकून ठेवा.