Home remedies for dark circles, How to get rid of dark circles, quick remedies for dark circles
डार्क सर्कल्समुळे चेहरा खूप विचित्र दिसतो? १ सोपा उपाय करा- आठवडाभरातच दिसेल फरक By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2024 03:03 PM2024-04-09T15:03:19+5:302024-04-09T15:36:13+5:30Join usJoin usNext चेहऱ्यावर डार्क सर्कल्स असतील तर चेहरा खराब दिसतो. म्हणूनच हा एक सोपा उपाय करून पाहा. (Home remedies for dark circles) डोळे कितीही सुंदर असू द्या, चेहरा कितीही रेखीव असू द्या. पण जर डोळ्यांभोवती काळी वर्तूळे म्हणजेच डार्क सर्कल्स असतील तर चेहऱ्याचे सगळे सौंदर्यच जाते. म्हणूनच डोळ्यांभोवतीची काही वर्तूळे कमी करण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही घरगुती पदार्थांचा वापर करायचा असून हा उपाय kitchenaapketipshumare या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जायफळ, ग्लिसरीन, बदाम आणि कॅस्टर ऑईल लागणार आहे. बदाम आणि जायफळ थोडं ग्लिसरीन आणि कॅस्टर ऑईल टाकून सहानीवर किंवा एखाद्या दगडावर उगाळून घ्या. हा लेप डोळ्यांच्याभोवती असणाऱ्या काळ्या वर्तूळावर लावा. यानंतर १० ते १५ मिनिटांनी डोळे धुवून टाका आणि माॅईश्चरायझर लावा. डोळे किंवा डोळ्यांभोवतीची त्वचा अतिशय संवेदनशील, नाजूक असते. त्यामुळे हा उपाय करण्यापुर्वी एकदा पॅचटेस्ट जरूर घ्या. टॅग्स :ब्यूटी टिप्सडोळ्यांची निगाहोम रेमेडीBeauty Tipseye care tipsHome remedy