हिरड्या ठणकतात- सूज येऊन खूप दुखतात? ५ घरगुती उपाय करा- हिरड्यांचं दुखणं लगेच कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2024 02:45 PM2024-02-14T14:45:57+5:302024-02-14T14:52:44+5:30

कधी कधी हिरड्या खूप ठणकतात, लालसर होऊन त्यांच्यावर सूज येते. एवढंच नाही तर त्यांना खूप खाजही येते. या दुखण्याला Gingivitis असं म्हणतात.

असा त्रास तुम्हाला होत असेल तर त्यावर कोणते घरगुती उपाय करता येतील, ते आता पाहूया...

सगळ्यात सोपा उपाय म्हणजे मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे. यासाठी आधी पाणी थोडं गरम करून घ्या. त्यात मीठ टाकून पाणी हलवून घ्या आणि या पाण्याने दिवसातून ४ ते ५ वेळा गुळण्या करा. त्या जागेवरचं बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.

आयुर्वेदानुसार oil pulling हा देखील यावरचा एक उत्तम उपाय मानला जातो. यासाठी सगळ्यात उत्तम तेल म्हणजेच खोबरेल तेल. खोबरेल तेलामध्ये असणारे ॲण्टीमायक्रोबियल गुणधर्म हिरड्यांचं दुखणं कमी करण्यासाठी मदत करतात.

कोरफडीचा गर गरम पाण्यात टाकून त्या पाण्याने गुळण्या केल्यास दुखऱ्या हिरड्यांना आराम मिळतो.

हळदीमध्ये थोडं साजूक तूप गरम करून टाका आणि दुखऱ्या हिरडीवर त्या हळदीने हळूवार चोळा. दुखणं बरं होईल.

बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट हिरड्यांवर लावून ठेवा. दुखणं कमी होण्यास आराम मिळेल. या पेस्टमध्ये लवंग पावडर टाकल्यास ते अधिक परिणामकारक ठरेल.