उन्हाळ्यात घाम येऊन चेहरा जास्तच ऑईली- चिपचिपित होतो? मुलतानी मातीसोबत लावा 'हे' ३ पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2024 09:20 AM2024-05-10T09:20:34+5:302024-05-10T09:25:01+5:30

उन्हाळ्यात आपल्याला खूप घाम येत असतो. त्यामुळे चेहरा खूप तेलकट, चिपचिपा होऊन जातो. ज्यांची त्वचा ऑईली आहे, त्यांना तर या दिवसांत हा त्रास खूपच होतो.

याशिवाय उन्हाळ्यात खूप जास्त टॅनिंगही होते. तेलकट चेहरा आणि टॅनिंग या दोन्ही समस्यांवर आता एक मस्त उपाय पाहा..

हा उपाय करण्यासाठी आपल्याला मुलतानी माती वापरायची आहे. मुलतानी माती चेहऱ्यासाठी चांगली आहेच, पण त्यात जर तुम्ही ३ पदार्थ टाकले तर चेहऱ्यावर अफलातून परिणाम दिसून येईल.

सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे हळद. हळद चेहऱ्याला छान चमक देते आणि टॅनिंग कमी करते.

दुसरा पदार्थ म्हणजे कॉफी पावडर. कॉफी पावडर नॅचरल स्क्रबर म्हणून काम करते. यामुळे डेड स्किन, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स निघून जाण्यास मदत होते.

तिसरा पदार्थ म्हणजे दही. दही त्वचेला हायड्रेटेड ठेवते तसेच त्वचेवर दह्यामुळे छान ग्लो येतो.

हे तिन्ही पदार्थ मुलतानी मातीत टाकून व्यवस्थित एकत्र करा. त्यानंतर तो लेप अर्ध्या तासासाठी चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवून टाका.

उन्हाळ्यात आठवड्यातून एकदा हा उपाय करावा. जर तुमची स्किन ड्राय असेल तर हा उपाय करू नये.