पावसाळ्यात थोडं खाल्लं तरी पोट गच्च होतं, गॅसेसचा त्रास होतो? ५ उपाय-चटकन वाटेल बरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2024 11:34 AM2024-07-27T11:34:50+5:302024-07-27T15:15:21+5:30

पावसाळ्यात आपला जठराग्नी मंद झालेला असतो. त्यामुळे या दिवसांत खाण्यापिण्याची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. खाण्यापिण्यात थोडे काही वेगळे पदार्थ आले तरी लगेच अपचन, ॲसिडीटी असा त्रास होतो.

बऱ्याचदा खाल्ल्यानंतर पोट गच्च होणे, गॅसेस होणे असेही त्रास जाणवतात. असं काही झालंच तर काय करावं याचे हे काही उपाय पाहून घ्या. यामुळे तुमचा पोटाचा त्रास कमी करण्यासाठी नक्कीच मदत होईल.

पोट फुगणे, ॲसिडीटी, अपचन असा त्रास कमी करण्यासाठी आल्याचा चहा किंवा आल्याचा काढा घेणे उपयुक्त ठरते.

पावसाळ्याच्या दिवसांत जेवण झाल्यानंतर आठवणीने १ ते २ टीस्पून बडिशेप व्यवस्थित चावून खावी. यामुळे पोट स्वच्छ होण्यास, पोटाचे विकार कमी होण्यास मदत होते. दुसरा उपाय म्हणजे बडिशेपाचा काढा करून प्या. त्यानेही आराम मिळेल.

पोट गच्चं झालं असेल, बद्धकाेष्ठतेचा त्रास होत असेल तर अशावेळी एक केळी खा. यामुळे पोट साफ होण्यास मदत होईल.

जुलाब होत असतील तर गरम पाण्यात लिंबू पिळून प्या. किंवा दूध न घालता कोरी कॉफी करा. त्यात थोडं लिंबू पिळा आणि ते गरम गरम असतानाच प्या.

पोट डब्ब झालं असेल, गच्च झाल्यासारखं वाटत असेल तर मिरेपूड पाण्यात उकळून त्याचा काढा प्या. त्यात हवंतर चवीसाठी थोडा गूळ घाला.