टॅनिंग घालविण्याचा एकदम सोपा उपाय- फक्त १० मिनिटांत काळवंडलेली त्वचा होईल स्वच्छ- चमकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2024 02:06 PM2024-01-27T14:06:24+5:302024-01-27T14:13:21+5:30

हिवाळ्यातल्या कोरड्या- थंड हवेमुळे त्वचा कोरडी होते आणि तिच्यावरचं टॅनिंग वाढतं.

अशावेळी वारंवार पार्लरमध्ये जाऊन फेशियल- क्लिनअप करणंही शक्य नसतं. म्हणूनच हा एक घरगुती उपाय पाहून घ्या.

चेहरा, मान काळी पडली असेल तर त्यावरचं टॅनिंग कमी करण्यासाठी कोणता उपाय करायचा, याविषयी माहिती देणारा व्हिडिओ praveenkkitchen या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीत १ चमचा कॉफी पावडर आणि १ चमचा साखर घ्या.

या मिश्रणात आता १ चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा मध घाला.

चिमूटभर हळद टाकून हे मिश्रण आता व्यवस्थित हलवून घ्या. थोडंसं हलवलं की साखर विरघळून जाईल आणि मऊ पेस्ट तयार होईल.

ही पेस्ट आता चेहऱ्यावर, मानेवर, गळ्यावर लावा आणि १० मिनिटे तशीच राहू द्या.

त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका. चेहरा धुतल्यानंतर मॉईश्चरायझर लावा.

यामुळे त्वचेवरचं टॅनिंग, डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा स्वच्छ, नितळ, चमकदार दिसेल.