home remedies for thin hair, how to make your thin hair strong and thick?
खोबरेल तेलात फक्त २ पदार्थ टाकून डोक्याला मालिश करा, पातळ केस होतील दाट- काळेभोर By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2024 04:48 PM2024-07-17T16:48:56+5:302024-07-17T16:52:20+5:30Join usJoin usNext तुमचे केस खूपच पातळ झाले असतील तर त्यांना योग्य पोषण देऊन घनदाट कसं करायचं, याविषयीचा हा एक सोपा उपाय पाहा... हा उपाय केल्यामुळे केसांची मुळं पक्की होण्यास मदत होते. त्यामुळे आपोआपच केस गळण्याचं प्रमाण खूप कमी होतं. हा उपाय नेमका कसा करायचा, याविषयीचा व्हिडिओ k_k_beautyofficial या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी २ टेबलस्पून एवढं आपलं नेहमीचं खोबरेल तेल एका वाटीमध्ये घ्या. त्यामध्ये आता १ चमचा कॅस्टर ऑईल टाका. कॅस्टर ऑईलमध्ये केसांसाठी पोषक ठरणारे अनेक घटक असतात. त्यामुळे त्याचा केसांवर खूप चांगला परिणाम दिसून येतो. या मिश्रणामध्ये ५ ते ७ थेंब रोजमेरी इसेंशियल ऑईल टाका. आता हे सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि त्याने केसांना मसाज करा. पहिल्याच वापरात केस गळणं बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचं लक्षात येईल. आठवड्यातून एकदा हा उपाय करावा, असं व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे. टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीBeauty TipsHair Care TipsHome remedy