मिरचीचा तिखटपणा कमी करण्यापासून चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्यापर्यंत तुरटीचा इवलासा खडा करेल जादू! By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2024 09:48 PM 2024-10-22T21:48:18+5:30 2024-10-22T21:57:00+5:30
How do you use alum in the kitchen : 6 Benefits Of Using Alum Or Fitkari In Your Kitchen : किचनमधील अनेक काम झटपट आणि सोप्या पद्धतीने करण्यासाठी तुरटीचा खडा येईल उपयोगी... किचनमधील अनेक काम सहजसोप्या पद्धतीने आणि पटकन होण्यासाठीदेखील आपण या तुरटीचा वापर (How do you use alum in the kitchen) करु शकतो. किचनची स्वच्छता करण्यापासून ते किचनमधील भाज्यांचा ताजेपणा दीर्घकाळ टिकवून ठेवण्यापर्यंत तुरटी अतिशय फायदेशीर ठरते. किचनमधील काही काम ही बरीच वेळखाऊ असतात अशी काम पटकन होण्यासाठी आपण काही टिप्स आणि ट्रिक्सचा वापर करतो. या ट्रिक्स वापरताना आपण तुरटीचा उपयोग करतो. किचनमधील कोणकोणत्या कामांसाठी आपण तुरटीचा वापर करु शकतो ते पाहूयात( 6 Benefits Of Using Alum Or Fitkari In Your Kitchen).
१. हिरव्या मिरचीचा तिखटपणा कमी करण्यासाठी :- तुरटीच्या छोट्याशा तुकड्याचा चुरा करुन घ्या. त्यानंतर एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्या पाण्यात हा तुरटीचा चुरा संपूर्णपणे विरघळू द्यावा. अशा तुरटीच्या पाण्यांत हिरव्या मिरच्या १० ते १५ मिनिटे भिजवून ठेवाव्यात, यामुळे मिरच्यांचा तिखटपणा कमी होण्यास मदत मिळते.
२. पालेभाज्यांचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी :- तुरटीचा चुरा पाण्यांत मिसळून या पाण्यांत पालक, मेथी, पुदिना, कोथिंबीर यांसारख्या हिरव्या पालेभाज्या १० मिनिटे भिजवून ठेवाव्यात. त्यानंतर या भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून मग स्वच्छ पुसून व्यवस्थित सुकवून एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करुन ठेवाव्यात. यामुळे हिरव्या पालेभाज्या लवकर खराब न होता दीर्घकाळ टिकतात.
३. लाकडाचा चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी :- लाकडाचा चॉपिंग बोर्डला येणारा वास आणि त्याची स्वच्छता करण्यासाठी तुरटीचा वापर करु शकता. यासाठी तुरटीचा खडा थेट लाकडी चॉपिंग बोर्डवर घासावा किंवा तुरटी पाण्यांत मिसळून हे पाणी आणि स्पंजच्या मदतीने चॉपिंग बोर्ड स्वच्छ घासावा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चॉपिंग बोर्ड धुवून घ्यावा.
४. पाणी शुद्धीकरणासाठी :- गढूळ पाणी शुद्धीकरणासाठी तुरटीचा वापर केला जातो हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. जर पाण्यांत भरपूर प्रमाणात गाळ असेल तर असे पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटीचा खडा या पाण्यात ५ ते ६ वेळा फिरवून घ्यावा. यामुळे पाण्यातील गाळ तळाशी जाऊन बसतो व फक्त शुद्ध पाणी वर राहते.
५. फळे व भाज्या स्वच्छ करण्यासाठी :- फळं आणि भाज्या यांवर वेगवेगळ्या प्रकारची किटकनाशक फवारलेली असतात. अशा भाज्या आणि फळं बाजारांतून विकत आणल्यानंतर त्या स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा उपयोग होऊ शकतो. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात तुरटीचा चुरा संपूर्णपणे विरघळू द्यावा. अशा पाण्याने फळे व भाज्या धुवून मग पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत.
६. साखरेचा पाक स्वच्छ करण्यासाठी :- रसगुल्ला, गुलाबजाम असे पदार्थ तयार करताना आधी पाक तयार करावा लागतो. हा पाक तयार होत असताना काहीवेळा या पाकाला पांढऱ्या रंगाचा फेस येतो किंवा साखर व्यवस्थित न विरघळता त्याचे खडे तसेच राहतात. अशावेळी तुरटीची पावडर करुन चिमूटभर पावडर या पाकात घालावी म्हणजे यातील साखरेचे न विरघळलेले खडे बाजूला होऊन एकतारी पारदर्शक पाक तयार होतो.