एसीच्या थंड हवेमुळे खराब होते त्वचा! डर्मेटोलॉजिस्टने सांगितलं कारण अन् सोपा उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 15:18 IST2025-04-10T15:08:30+5:302025-04-10T15:18:46+5:30
एसीची थंड हवा काही मिनिटांत उष्णता नाहीशी करते आणि आपल्यालाही बरं वाटतं. पण तुम्हाला माहिती आहे का की, एसीची हवा तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकते.

उन्हाळ्यात प्रचंड गरम होतं. अशा वेळी गरमीपासून आराम मिळवण्यासाठी लोक आपल्या घरांमध्ये आणि ऑफिसमध्ये एअर कंडिशनर (AC) लावतात. यामुळे थंडावा मिळतो.
एसीची थंड हवा काही मिनिटांत उष्णता नाहीशी करते आणि आपल्यालाही बरं वाटतं. पण तुम्हाला माहिती आहे का की, एसीची हवा तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकते. यामुळे त्वचा खराब होते.
जालंधर येथील डर्मेटोलॉजिस्ट डॉ. मनजोत मारवाह यांनी एका पॉडकास्टमध्ये याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
डॉ. मनजोत यांनी पॉडकास्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, "खूप थंड असल्याने तुम्हाला ह्युमिडिफायरची आवश्यकता आहे."
"त्वचेत दोन गोष्टी असतात. एक म्हणजे वॉटर बॅलेन्स आणि दुसरे म्हणजे ऑईल बॅलेन्स. ऑईली स्किन असलेल्या लोकांमध्ये ऑईल बॅलेन्स जास्त असतो. ड्राय स्किन असलेल्यांमध्ये कमी असतो."
"वॉटर बॅलेन्स ही एक स्वतंत्र गोष्ट आहे. ज्यांची ऑईली स्किन आहे त्यांनाही ड्रायनेस जाणवू शकतो."
"वॉटर बॅलेन्स कमी झाल्यानंतर स्किन थोडी खेचल्यासारखी, रफ झालेली दिसते. आपल्याला त्वचेतील बदल जाणवतो."
"त्वचा खराब होऊ नये असं वाटत असेल तर जास्त वेळ एसीमध्ये बसू नका. एसीचा आरोग्यावरही वाईट परिणाम होतो."
"जर तुम्हाला एसीत बसावं लागत असेल तर तुम्ही तुमच्यासोबत मॉइश्चरायझर ठेवावं. मॉइश्चरायझर त्वचेला लावू शकता."