सामोसा-गुलाबजाम खाल्ले भरपूर तर तेवढ्या कॅलरी जाळायला तुम्हाला किती चालावं लागेल, माहिती आहे? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 07:29 PM 2024-10-10T19:29:39+5:30 2024-10-10T19:40:26+5:30
How Many Steps To Burn Your Favourite Junk Food How Much Exercise To Burn Off Junk Food : How Long Do You Need To Walk To Burn Off Your Favourite Foods : कोणता पदार्थ खाल्ल्यावर कॅलरीज बर्न करण्यासाठी नेमकं किती वेळ चालावं ते पाहूयात... आपल्याला सगळ्यांनाच फास्टफूड, जंकफूड, तेलकट, मसालेदार आणि गोडाधोडाचे पदार्थ खायला खूप आवडतात. बरेचदा आपण सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या टी टाईमच्या वेळी असे पदार्थ खाणे पसंत करतो. या पदार्थांमध्ये सामोसा, पिझ्झा, बर्गर, पराठा, गुलाबजाम अशा अनेक चटपटीत पदार्थांचा समावेश असतो. या पदार्थांमध्ये फार मोठ्या प्रमाणांत कॅलरीज असतात. जेव्हा आपण असे पदार्थ वारंवार खातो तेव्हा आपल्या शरीरात फॅट्स आणि कॅलरीजचे प्रमाणात वाढते. या कॅलरीज बर्न करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज किंवा वॉकिंग करतो. परंतु असे पदार्थ खाल्ल्यानंतर कॅलरीज बर्न करण्यासाठी नेमकं किती वेळ चालाव हे आपल्याला माहित नसतं. असे कोणते पदार्थ खाल्ल्यावर आपल्याला त्यातून किती कॅलरीज मिळतात, आणि या कॅलरीजप्रमाणे त्या बर्न करण्यासाठी नक्की किती वेळ चालावं ते पाहूयात(How Long Do You Need To Walk To Burn Off Your Favourite Foods).
१. सामोसा :- एका सामोशात २६२ कॅलरीज असतात. जर आपण एक सामोसा खाल्ला तर या कॅलरीज बर्न करण्यासाठी आपल्याला १ तास वॉकिंग करावे लागेल.
२. गुलाबजाम :- गोडधोड पदार्थांमध्ये गुलाबजाम हा सगळ्यांच्याच विशेष आवडीचा पदार्थ आहे. एका गुलाबजाममध्ये १७५ कॅलरीज असतात आणि त्या बर्न करण्यासाठी आपल्याला ४५ मिनिटे चालावे लागेल. गुलाबजाम समोर दिसले की आपण फक्त एकच गुलाबजाम खात नाही, त्यामुळे गुलाबजाम खाताना कॅलरीजचा नक्की विचार करा.
३. छोले - भटुरे :- मस्त मसालेदार, झणझणीत छोले - भटुरे म्हटलं की तोंडाला पाणी सुटत. साधारणतः एक प्लेट छोले - भटुरे खाल्ले असता आपल्याला ४२५ इतक्या कॅलरीज मिळतात. या इतक्या कॅलरीज बर्न करण्यासाठी आपल्याला १ तास ४५ मिनिटे चालावे लागेल.
४. आलू पराठा :- बटर न लावलेल्या एका आलू पराठ्यात जवळपास २४० इतक्या कॅलरीज असतात. इतक्या कॅलरीज बर्न करण्यासाठी आपल्याला ५५ मिनिटे वॉकिंग करावे लागेल.
५. चीझ पिझ्झा (१० इंचाचा) :- १० इंचाच्या एका चीझ पिझ्झ्यात १००० कॅलरीज असतात. या इतक्या कॅलरीज बर्न करण्यासाठी आपल्याला चक्क ४ तास चालावे लागेल.