how many hours should one sleep daily according to age
वयानुसार रात्री किती तासांची झोप गरजेची असते? मुलांनी किती तास झोपावं? बघा तज्ज्ञांचा सल्ला By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2024 09:07 AM2024-07-24T09:07:03+5:302024-07-24T09:10:02+5:30Join usJoin usNext रात्रीची झोप पुर्ण झाली तर आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात. त्यामुळे रात्री लवकर झोपावं आणि सकाळी लवकर उठावं, असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात. पण आता मात्र त्याच गोष्टींकडे बहुतांश लोकांचं दुर्लक्ष होत आहे. रात्री अनेकजण मोबाईल बघत बसतात. त्याचा परिणाम झोपेवर होतो. स्क्रिन पाहून झोपल्याने चटकन झोप येत नाही. त्यामुळे मग रात्री बरीच उशीरा झोप लागते आणि मग खूपदा अपुरी झोप होते. नॅशनल स्लीप फाउंडेशन यांच्या अभ्यासानुसार वयानुसार प्रत्येकाची रात्रीच्या झोपेची गरज वेगवेगळी असते. त्यानुसार १ ते ५ वर्षांपर्यंतच्या मुलांनी ११ ते १४ तास झोपायला पाहिजे. ६ ते १२ वर्षे वयाच्या मुलांची रात्रीची झोप ९ ते १२ तासांची असायला पाहिजे. १३ ते १८ या वयोगटातील मुलांसाठी १० तासांची झोप पुरेशी ठरते. १८ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी ७ तासांची रात्रीची झोप घ्यायलाच पाहिजे. टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सलहान मुलंHealthHealth Tipskids