कांदा चिरताना डोळ्याला पाण्याच्या धारा? ८ टिप्स, कांदा चिरताना डोळ्यात एक थेंब पाणी येणार नाही By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2024 01:38 PM 2024-11-30T13:38:39+5:30 2024-12-02T17:04:44+5:30
How to Chop Onions Without Tears 8 Tips : How to Cut Onions Without Crying : 8 trick to cutting onions without crying : How to Actually Prevent Tears When Chopping Onions : कांदा चिरताना डोळ्यातून घळाघळा पाणी येत असेल तर, या ८ टिप्सची मदत घेऊन पाहा... कांदा खायला जितका रुचकर लागतो तितकाच चिरताना रडवतो. कांदा चिरताना बऱ्याचदा डोळ्यातून ( 8 trick to cutting onions without crying) पाणी येतं. खरंतर कांद्यात असणाऱ्या एन्झाईम्समुळे कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं. कांदा कापताना डोळ्यांत पाणी येत त्यामुळे अनेकजणींना कांदा कापणे खूप अवघड काम वाटत. यासाठीच, बहुतेकवेळा आपण कांदा चिरायचे कंटाळवाणे काम टाळतो. परंतु डोळ्यांतून अश्रूचा एक थेंबही न काढता जर कांदा कापायचा असेल तर काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवाव्यात. या ट्रिक्स फॉलो केल्या तर कांदा चिरताना आपल्या डोळ्यांतून पाणी येणार नाही.
१. सगळ्यात आधी कांदा नीट सोलून घ्या. त्यानंतर कांद्याचे दोन तुकडे करा. हे तुकडे १५ ते २० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. तुमच्याकडे जर व्हिनेगर असेल तर त्या पाण्यात तुम्ही ते टाकू शकता. यामुळे कांद्यातील एन्झाइम्स बाहेर पडते आणि तो चिरताना डोळ्यात पाणीही येत नाही.
२. कांदा चिरत असताना तो धारदार चाकूने चिरा. कारण धारदार चाकूने कांदा चिरला की कांद्याचा थर कापला जातो. तसंच यामुळे कांद्यातील एन्झाइम्स बाहेर पडते. त्यामुळे कांदा चिरताना डोळ्यात पाणी येत नाही.
३. कांदा चिरण्यापूर्वी सुरीच्या पात्यांना हलकेच बोटाने तेल लावून मग अशा सुरीने कांदा कापावा म्हणजे डोळ्यांत पाणी येत नाही.
४. कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये यासाठी कांदा चिरण्यापूर्वी तो २० ते २५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे कांद्यातील एन्झाइम्सचा प्रभाव कमी होतो आणि यानंतर कांदा चिरल्यानंतर डोळ्यांना त्रासही होत नाही.
५. कांदा वरच्या बाजूने चिरला तर, त्यातील एन्झाईम्स डोळ्यांवर जास्त परिणाम करतात. ज्यामुळे डोळ्यांना जळजळ होते. म्हणूनच कांदे नेहमी मुळापासून म्हणजेच खालच्या बाजूने चिरायला हवे. कांदे मुळापासून चिरल्याने एन्झाईम्सचा प्रभाव कमी होतो.
६. कांदा चिरताना डोळ्यांची जळजळ होऊ नये म्हणून कांदा चिरण्यापूर्वी चाकूवर थोडासा लिंबाचा रस लावा.
७. कांदा चिरताना जवळ दिवा किंवा मेणबत्ती लावून ठेवा. यामुळे कांद्यामधून बाहेर पडणारे एन्झाइम उष्णतेकडे वळतील. व याचा प्रभाव डोळ्यांवर होणार नाही. ज्यामुळे कांदा चिरताना डोळ्यांमधून पाणी येणार नाही.
८. एका बाऊलमध्ये थंडगार बर्फाचे पाणी घ्या, त्यात कांद्याच्या फोडी १५ मिनिटांसाठी ठेवा, नंतर कांदा चिरा. थंड पाण्यामुळे कांद्यामधील रसायने बाहेर पडण्यापासून रोखले जातात. ज्यामुळे कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येत नाही.