आय लायनर लावताना हात थरथरतात? 5 ट्रिक्स, डोळे दिसतील आकर्षक-परफेफ्ट लायनर लागेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 04:12 PM2023-09-26T16:12:43+5:302023-09-27T10:02:51+5:30

How to Apply Eyeliner in Perfect Way : लायनर लावताना डोळ्यांच्या बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूला लायनर लावा

डोळे कसेही दिसत असले तरी लायनर लावल्यानंतर डोळ्यांची शाईन वाढते आणि डोळे अधिकच सुंदर दिसतात. पण लायनर डोळ्यांना लावल्यानंतर जितकं छान दिसतं तितकंच ते लावायलाही फार कष्ट घ्यावे लागतात. (How To Apply Eyeliner Perfectly)

लायनर लावणं सर्वांनाच जमतं असं नाही. लायनर लाववताना हात थरतात तर कधी हवेतसे विंग्स बाहेर येत नाहीत. परफेक्ट आय लायनर लावण्याच्या सोप्या टिप्स पाहूया. (How to Apply eye linear in perfect way)

पेन्सिल, जेल आणि लिक्वीड आय लायनर या ३ प्रकारचे लायनर सर्वाधिक वापरले जातात. पहिल्यांदा आयलायनर लावत असाल तर तुम्ही पेंसिल आयलायनर वापरू शकता.

लायनर विकत घेताना ३ गोष्टींची काळजी घ्यायला हवी. लायनर स्मजप्रुफ, वॉटरप्रुफ आणि लॉग्नलास्टींग असायला हवं.

लिक्वीड लायनर लावत असाल तर बॉटल व्यवस्थित शेक करून घ्या. डोळ्यांचा वरचा भाग स्ट्रेच करून त्यावर सरळ रेषेत लायनर लावा.

लायनर लावताना डोळ्यांच्या बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूला लायनर लावा. बाहेरचा भाग थोडा मोठा ठेवा. आतली बाजू पातळ ठेवा.

लिक्वीड लायनर खूप लवकर पसरतं. त्याऐवजी तुम्ही पेन्सिल आय लायनरचा वापर करू शकता. पेन्सिल आय लायनर लावणं तुलनेने फार सोपं आहे.

आयलायनर लावल्यानंतर मस्कारा लावा. जेणेकरून डोळ्यांच्या पापण्या खुलून दिसतील.