how to apply kajal without smudging, 2 tips to make your simple kajal smudge proof
पावसाळ्यात काजळ पसरून डोळ्यांखालचा भाग काळवंडतो? २ टिप्स- काजळ पसरणार नाही By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2024 12:45 PM2024-07-17T12:45:27+5:302024-07-17T18:44:57+5:30Join usJoin usNext काजळ लावल्यावर आपल्या डोळ्यांचं आणि चेहऱ्याचं सौंदर्य छान खुलून येतं. पण बऱ्याचदा असं होतं की कितीही महागडं स्मज प्रुफ काजळ लावलं तरी पुढच्या २ ते ३ तासांतच ते पसरतं आणि मग डोळ्यांखालचा भाग काळवंडून चेहराच विचित्र दिसू लागतं. विशेषत: पावसाळ्यात तर हा त्रास जरा जास्तच जाणवतो. (how to apply kajal without smudging?) म्हणूनच असं होऊ नये आणि ७ ते ८ तास तरी काजळ डोळ्यांवर जशास तसं राहावं, अजिबात पसरू नये, यासाठी काय उपाय करायचा याविषयीची माहिती reenaz_world या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. (2 tips to make your simple kajal smudge proof) यामध्ये सांगितलेला पहिला उपाय म्हणजे काजळ लावल्यानंतर त्यावरून लिक्विड आयलायनर फिरवा. आय लायनर वॉटरप्रुफ असावं. यामुळे काजळ अधिक छान उठून दिसेल आणि ते पसरणारही नाही. दुसरा उपाय म्हणजे काजळ लावल्यानंतर एखादं काळं किंवा डार्क ब्राऊन, ग्रे रंगाचं आयशॅडो घ्या आणि ते एखाद्या टुथपिकवर किंवा एखाद्या आयशॅडो ब्रशवर घेऊन डोळ्यांना लावलेल्या काजळावर ठेवून नुसतं टॅप- टॅप करा... यामुळेही काजळ अजिबात पसरणार नाही. टॅग्स :ब्यूटी टिप्समेकअप टिप्सडोळ्यांची निगाइन्स्टाग्रामBeauty TipsMakeup Tipseye care tipsInstagram