How to boost immunity in winter, 5 Superfood for winter, Winter food that helps for immunity
हिवाळ्यात आजारपण टाळण्यासाठी 'हे' ५ पदार्थ खा, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा सोपा उपाय By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2023 09:15 AM2023-12-20T09:15:44+5:302023-12-20T09:20:02+5:30Join usJoin usNext सर्दी, खाेकला, कफ असं आजारपण टाळायचं असेल तर इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला पाहिजे. म्हणूनच सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सांगितलंय की हिवाळ्यात सुपरफूड ठरणारे काही पदार्थ आवर्जून खा, जेणेकरून वारंवार आजारपण येणार नाही. यातला सगळ्यात पहिला पदार्थ आहे बाजरी. तूप किंवा लोण्यासाठी बाजरीचे पदार्थ हिवाळ्यात खावेत. कारण बाजरीतून मिळणारे फायबर आणि वेगवेगळी खनिजे सांधेदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. सायनस तसेच सर्दीचा त्रास कमी करण्यासाठी हिवाळ्यात दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर गूळ आणि तूप एकत्र करून खावे. हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. हा त्रास होऊ नये म्हणून कुळीथ या दिवसांत आवर्जून खावे. घरी केलेलं लोणी खाणंही गरजेचं आहे. कारण यामुळे व्हिटॅमिन डी मिळते. तसेच ते हाडांसाठी अतिशय चांगले असते. तिळामध्ये असणारे घटक त्वचा, केस आणि डोळे चांगले ठेवण्यासाठी पोषक असतात. त्यामुळे हिवाळ्यात पुरेसे तीळ खा.टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नआरोग्यथंडीत त्वचेची काळजीWeight Loss TipsfoodHealthWinter Care Tips