ड्रेसच्या रंगानुसार लिपस्टिकची शेड कशी निवडायची? बघा ६ टिप्स- दिसाल आणखी सुंदर- आकर्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2023 03:25 PM2023-12-13T15:25:31+5:302023-12-13T15:50:18+5:30

लिपस्टिक लावल्याने तुमचं व्यक्तिमत्त्व खुलण्यास आणखी मदत होते, हे अगदी खरं आहे. पण त्यासाठी तुम्ही लावत असलेली लिपस्टिक तुम्हाला सूट झाली पाहिजे.

बऱ्याचदा आपण तयार होताना लिपस्टिकचा कोणता शेड लावावा, याबाबतीत कन्फ्यूज असतो. असं लिपस्टिकचा शेड निवडण्याबाबत कोणतंही कन्फ्यूजन मनात असेल तर या ५ टिप्स तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरू शकतात. (5 tips for the perfect lipstick shade )

यामध्ये आपण कोणत्या रंगाच्या ड्रेसवर कोणत्या रंगाची लिपस्टिक लावली तर अधिक खुलून दिसते, ते पाहूया.. (How to choose lipstick shade according to the dress colour)

तुमचा ड्रेस जर लाल किंवा केशरी रंगाचा असेल तर त्यावर गुलाबी किंवा मरून रंगाची लिपस्टिक छान दिसेल.

पांढरा, मोतिया रंगाचा ड्रेस घातल्यावर न्यूड शेड किंवा गुलाबी शेडमधली लिपस्टिक लावावी.

निळ्या रंगाच्या ड्रेसवर पीच किंवा लाईट पिंक लिपस्टिक छान दिसते.

हिरवा रंगाचा ड्रेस घातल्यावर नेहमीच न्यूड किंवा हलका बरगंडी शेड असणारी लिपस्टिक लावा. आणखी सुंदर दिसाल.

पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल तर ऑरेंज किंवा ब्रीक रेड शेडची लिपस्टिक अधिक आकर्षक वाटेल.

काळ्या रंगाचा ड्रेस असेल तर लाल, मरून किंवा कॉफी कलरची लिपस्टिक लावा.