चेहऱ्याच्या आकाराप्रमाणे करा परफेक्ट टिकलीची निवड, ५ टिप्स.. चेहरा दिसेल खुलून..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2022 02:19 PM2022-10-29T14:19:46+5:302022-10-29T14:24:46+5:30

१. सणासुदीला किंवा अगदी आपल्या रोजच्या रुटीनमध्ये तयार होताना आपण छान तयार होतो, पण टिकली कशी लावावी, हे बऱ्याचदा कळत नाही. टिकलीमुळे आपला चेहरा आणखी खुलून दिसू लागतो किंवा मग टिकलीची निवड चुकली तर त्याच्या उलटही होऊ शकतं.

२. म्हणूनच चेहऱ्याच्या आकारानुसार योग्य टिकलीची निवड होणं गरजेचं आहे. त्यासाठीच या काही खास टिप्स. तुमच्या चेहऱ्याचा आकार नेमका कसा आहे ते बघा आणि त्यानुसार कोणती टिकली लावायची ते ठरवा.

३. माधुरी दीक्षित किंवा सोनम कपूरप्रमाणे चेहऱ्याचा आकार ओव्हल शेप असेल तर उभट टिकली लावणं टाळा. यामुळे चेहरा आणखी लांब वाटू शकतो.

४. चेहऱ्याचा आकार गोलाकार असेल, तर गोल टिकल्या लावू नका. उभट टिकल्या तुम्हाला अधिक छान दिसतील आणि त्यामुळे चेहऱ्याचा आकार आणखी बॅलेन्स झाल्यासारखा वाटेल.

५. चेहऱ्याचा आकार जर त्रिकोणी असेल तर गोलाकार आणि मोठी टिकली लावण्यास प्राधान्य द्या.

६. चौकोनी चेहरा असेल तर गोलाकार, चंद्रकोर, अंडाकृती टिकल्या तुम्हाला जास्त शोभून दिसतील.

७. जर तुमचे डोळे मोठे आणि टपोरे असतील तर आकाराने मोठ्या टिकल्या लावा.