कपड्यावर ऑईल पेंटचे डाग पडले? ४ सोपे उपाय करा, डाग कुठे पडले होते ते लक्षातही येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2023 03:49 PM2023-12-14T15:49:35+5:302023-12-14T15:53:44+5:30

बऱ्याचदा कळत नकळत आपल्या चांगल्या कपड्यांवर ऑईल पेंटचे डाग पडतात. आपण नेहमीच्या पद्धतीने हे डाग धुतले तर ते निघत नाहीत.(How to clean oil paint stains on clothes?)

म्हणूनच आता हे काही सोपे उपाय बघून घ्या.. यामुळे कपड्यांवर पडलेले ऑईल पेंटचे डाग निघून जातील (4 tips to remove oil paint stains). कपडा एवढा स्वच्छ होईल की डाग नेमके कुठे पडले होते, ते लक्षातही येणार नाही. (simple hacks to get rid of oil paint stains from clothes)

कपड्यावर latex पेंटचे किंवा acrylic पेंटचे डाग पडले असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोल वापरा. एका भांड्यात अल्कोहोल घेऊन त्यात कपड्यावर जिथे डाग पडला आहे, तो भाग बुडवून ठेवा. साधारण १० ते १२ मिनिटांनी टुथब्रशने घासून तो डाग काढून टाका.

कपड्यावर जर ऑईल पेंटचा डाग पडला असेल तर अल्कोहोल, पाणी आणि बेकिंग सोडा यांची एक दाट पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागांवर लावा. त्यानंतर ती पेस्ट वाळू द्या. त्यानंतर त्यावर गरम पाणी टाका आणि टुथब्रशने घासून स्वच्छ करा. डाग निघून जाईल.

नेलपेंट रिमुव्हरचा वापर करूनही कपड्यांवरचे पेंटचे डाग काढून टाकता येतात.

पेंटचा डाग ज्याठिकाणी पडला आहे, त्याठिकाणी हॅण्ड सॅनिटायझर लावा. साधारण १० ते १५ मिनिटांनी ब्रशने घासून गरम पाण्याने ती जागा धुवून घ्या. डाग निघून जातील.