चष्म्याच्या काचा स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक, फक्त १ मिनिटाचा उपाय- काचांवर स्क्रॅचेस येणारच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2024 09:16 AM2024-05-28T09:16:42+5:302024-05-28T09:20:02+5:30

पुर्वी चष्मा म्हटलं की अनेक जण नाकं मुरडायचे. पण आता मात्र अनेक जण हौशीने चष्मा लावून अतिशय स्मार्ट लूक करतात.

बाजारात चष्म्याच्या एकापेक्षा एक ट्रेण्डी, आकर्षक फ्रेम मिळत आहेत. त्यामुळे मग चष्मा आता मुळीच आधीसारखा कंटाळवाणा राहिलेला नाही. उलट आता तर ड्रेसनुसार स्टायलिश फ्रेम्सची निवड केली जाते.

असं असलं तरी रोजच्या रोज चष्मा स्वच्छ करणे आणि त्यावर स्क्रॅचेस येऊ नये म्हणून त्याला जपणे हे थोडं अवघड काम आहे. हेच अवघड काम सोपं कसं करायचं याविषयीचा एक व्हिडिओ simply.marathi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

यामध्ये असं सांगितलं आहे की एखाद्या मिनिटासाठी तुमचा चष्मा फ्रिजरमध्ये ठेवून द्या. त्यानंतर तो जेव्हा तुम्ही बाहेर काढाल तेव्हा त्यावर सगळं फॉग जमा झालेलं असेल. ते सगळं चष्मा स्वच्छ करण्याच्या कपड्याने पुसून घ्या. त्यानंतर तुमच्या चष्म्याच्या काचा अगदी नव्यासारख्या चकाचक झालेल्या असतील. एखाद्या दिवशी हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही.

चष्म्याच्या काचा नव्यासारख्या चकाचक करण्याचा आणखी एक सोपा उपाय म्हणजे आंघोळीच्या वेळी चष्मा तुमच्यासोबत नेणे. अंघोळ होईपर्यंत चष्मा बाथरुममध्ये ठेवला तरी त्याच्या काचांवर वाफेचा हलका थर जमा होतो. अंघोळ केल्यानंतर एखाद्या ओलसर सुती कपड्याने तो पुसून घ्या. चष्मा अवघ्या काही सेकंदातच स्वच्छ होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावर चरे पडणार नाहीत.