how to clean stains on kitchen towel, how to wash microfibre napkins in kitchen
स्वयंपाकघरातले नॅपकिन चिकट, कडक होतात- कळकट नॅपकिन स्वच्छ करण्याचा १ सोपा उपाय By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2024 09:18 AM2024-04-22T09:18:21+5:302024-04-22T19:05:45+5:30Join usJoin usNext स्वयंपाक घरातले हात पुसण्याचे नॅपकिन वारंवार खरकटे हात लागल्याने चिकट, तेलकट होतात. त्यांचा रंगही अगदीच कळकट दिसू लागतो. हे नॅपकिन आपण धुवायला टाकतो, पण हळूहळू त्यांच्यातला तेलकटपणा, खरकटेपणा स्वच्छ झाला नाही तर ते नॅपकिन कडक होऊ लागतात. शिवाय त्यांच्यातला कळकटपणा निघतही नाही. तुमच्या घरातले असे खराब झालेले नॅपकिन पुन्हा नव्यासारखे चकाचक करण्यासाठी हा एक घरगुती उपाय करून पाहा. हा उपाय housewife_to_homemaker या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला व्हिनेगर लागणार आहे. सगळ्यात आधी एका पातेल्यात कडक पाणी करून घ्या. त्या पातेल्यात २ ते ३ टेबलस्पून व्हिनेगर आणि १ टेबलस्पून लिक्विड डिटर्जंट टाका आणि त्यामध्ये जवळपास अर्ध्या तासासाठी नॅपकिन भिजत ठेवा. यानंतर ते नॅपकिन कपडे घासण्याच्या ब्रशने घासून स्वच्छ करा. पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यातून धुवून घ्या आणि घट्ट पिळून वाळायला टाका. नॅपकिनवरचे सगळे कळकट डाग निघून जातील. टॅग्स :स्वच्छता टिप्सहोम रेमेडीकिचन टिप्सCleaning tipsHome remedykitchen tips