बेसिनवर काळे-पिवळे डाग पडले, अस्वच्छ दिसतं? ५ टिप्स, चकचकीत-स्वच्छ दिसेल वॉश बेसिन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 12:53 PM2023-08-27T12:53:18+5:302023-08-28T12:00:01+5:30

How to clean wash basin : वॉश बेसिनचा पिवळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही टुथपेस्टचा वापर करू शकता.

घर नेहमी स्वच्छ ठेवणं कोणत्याही टास्कपेक्षा सोपं नाही. (Home Cleaning Tips) क्लिनिंग करत असताना प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. (Cleaning Tips) नेहमी स्वच्छ केले तरी वॉश बेसिनवर पिवळेपणा दिसतो. बाथरूम अस्वच्छ दिसतं. अशावेळी साफसफाई नक्की कशी करावी असा प्रश्न पडतो

बेसिनवर गंजाचे, तेलाचे डाग पडल्यानं कळकट दिसू लागतं. वॉश बेसिनचा वापरताना जर त्यावर पिवळे डाग दिसले तर दिसायला फारच विचित्र दिसतं. हे डाग दूर करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स पाहूया. (How to clean wash besin)

वॉश बेसिन पिवळं पडलं असेल आणि रगडून रगडून स्वच्छ केल्यानंतरही ते साफ दिसत नसेल तर कमर्शियल क्लिनरचा वापर करा. मार्केटमध्ये बऱ्याचप्रकारचे क्लिनर्स उपलब्ध आहेत. याच्या मदतीनं तुम्ही वॉश बेसिन स्वच्छ करू शकता. हातात ग्लोव्हज घालून सगळ्यात आधी हे लिक्वीड बेसिनमध्ये घाला नंतर एका ब्रशच्या साहाय्याने ते घासून घ्या. मग स्वच्छ पाण्यानं धुवा.

बेसिन पिवळं पडलं असेल तर ते क्लिन करण्यासाठी व्हाईट व्हिनेगर हा उत्तम पर्याय आहे. व्हाईट व्हिनेगरमध्ये एसिटिक एसिड असते जे पिवळटपणा दूर करते. याचा वापर करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही व्हाईट व्हिनेगर आणि थोडं पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरून त्यावर स्प्रे मारा. ५ ते १० मिनिटं तसेच सोडून द्या. शेवटी सिंक क्लिन करा. या उपायामुळे डाग आणि पिवळेपणा दूर होण्यास मदत होईल.

रबिंग अल्कोहोलच्या मदतीनं तुम्ही वॉश बेसिनचा पिवळेपणा दूर करू सकता. यासाठी सगळ्यात आधी वॉश बेसिन पाण्यानं व्यवस्थित स्वच्छ करा. त्यानंतर बेकींग सोडा बेसिनवर स्प्रिंकल करा. आता स्पंजच्या मदतीनं स्क्रब करा. एकदा वॉश बेसिनला स्क्रब करून स्पंजला अल्कोहोल लावा आणि नंतर बाथरूम सिंकवर घाला. शेवटी पाण्यानं स्वच्छ धुवा.

डायड्रोजन पेरोक्साईड वॉश बेसिनवरचा पिवळेपणा घालवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. हायड्रोजन पेरोक्साईड आणि पाणी समान प्रमाणात मिसळून त्यात पाणी घाला वॉश बेसिनमध्ये घाला १५ ते २० मिनिटं असंच ठेवल्यानंतर ब्रशच्या साहाय्याने घाला आणि नंतर त्यावर पाणी घाला. बेसिन ५ मिनिटांत स्वच्छ होईल.

वॉश बेसिनचा पिवळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही टुथपेस्टचा वापर करू शकता. वॉशबेसिन टूथपेस्टच्या साहाय्याने सहज स्वच्छ करता येते. यासाठी टुथपेस्ट वॉश बेसिनवर लावा त्यानंतर सॉफ्ट ब्रशच्या मदतीनं बेसिन रब करा. शेवटी वॉस पाण्यानं स्वच्छ करा.

प्यूमिक स्टोनने फक्त वॉश बेसिनचा पिवळेपणा नाही तर इतर डागही दूर करता येतात. यासाठी प्युमिक स्टोन ओला करा नंतर वॉश बेसिनच्या पिवळ्या भागावर लावा. नेहमी ओला प्युमिक स्टोन वापरा. यामुळे स्क्रॅच पडणार नाहीत. शेवटी प्लूमिक स्टोन पाण्यानं स्वच्छ धुवा.