How to decorate Mangalagaur with simple and easy tricks? Mangalagaur decoration idea
आकर्षक पद्धतीने झटपट कशी सजवायची मंगळागौर, बघा ५ टिप्स- डेकोरेशन होईल सुरेख- सुंदर By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2023 09:11 AM2023-08-25T09:11:43+5:302023-08-25T09:15:02+5:30Join usJoin usNext आपल्याघरची मंगळागौर आकर्षक दिसावी, असं वाटत असेल तर तिच्या भोवती थोडीफार सजावट करावीच लागेल. पण नेमकी सजावट करायची कशी आणि ते ही अगदी कमी वेळात, हे लक्षात येत नसेल तर या काही टिप्स बघा. अशा पद्धतीने मागच्या बाजूने थर्माकोलचा किंवा कागदाचा नाग फणा करू शकता. आजूबाजूला कुंड्या ठेवून हिरवळ करा आणि मध्यभागी फुलांनी महादेव सजवा. मंगळागौरीला महादेवाचे पूजन करतात. आता महादेव म्हटल्यावर मागे छानसा हिमालय करून मस्त डेकोरेशन करता येईल. हिमालय करणे तसं सोपं आहे. एकावर एक कुंड्या ठेवा, कुंड्यांमधल्या मातीत काठ्या रोवा आणि त्यावर पांढरा कपडा टाका. केळीचे खांब चौरंगाच्या चारही बाजूने लावून अशा पद्धतीनेही मंगळागौर सजवता येईल. यासाठी खूप वेळ देण्याचीही गरज नाही फुलं आणि पानं यांच्या मदतीने अशा पद्धतीने मंगळागौर सजवा. झटपट होईल आणि छानही दिसेल. मोठी रांगोळी काढूनही अशा पद्धतीने महादेव सजवता येईल. कापसाचा हिमालयही करता येतो. अशा पद्धतीनेही कापूस चिटकवून हिमालयाचा आकर्षक देखावा करता येतो.टॅग्स :सोशल व्हायरलश्रावण स्पेशलSocial ViralShravan Special