भेळवाल्यासारखा एकदम बारीक कांदा कापण्याची सोपी ट्रिक; पटकन चिरून होईल पातळ कांदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 11:13 AM2023-03-01T11:13:00+5:302023-03-01T11:15:02+5:30

How To Finely Chop An Onion : कांदा बारीक चिरण्यासाठी, प्रथम सोलून घ्या. जर तुम्ही साल वेगळे न करता कापले तर त्रास होऊ शकतो आणि ते सहज कापले जाणार नाही.

रोजच्या स्वंयपाकासाठी प्रत्येकालाच कांदा लागतोच.(Cooking Hacks) कांद्याशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येत नाही. कांदा जाड कापला असेल आणि व्यवस्थित शिजला नाही तर बरोबर लागत नाही. बारीक कांदा व्यवस्थित शिजला असेल तर तो पदार्थात एकरूप होतो आणि जेवणाची चव वाढते. पावभाजी किंवा मिसळ बनवल्यानंतर वरून टाकण्यासाठी कांदा बारीक चिरलेला असेल तर त्याची मजाच काही वेगळी. (A simple trick to finely chop an onion)

बारीक कांदा कापणं सर्वांनाच जमतं असं नाही. हॉटेलमध्ये गेल्यानंतर आचारी इतक्या वेगानं बारीक कांदे कसे कापत असतील असा प्रश्न पडतो. या लेखात कांदा कापण्याची सोपी ट्रिक पाहूया. जेणेकरून रोजच्या स्वयंपाकासाठी पटकन मनासारखे बारीक कांदे कापून होतील. (How To Finely Chop An Onion)

1) कांदा कापण्यापूर्वी, सर्वप्रथम तो पूर्णपणे कोरडा आणि ताजा असेल लक्ष द्या. यासाठी तुम्ही त्यांना काही काळ हवेत ठेवू शकता. त्यानंतरच ते कापण्यासाठी वापरा. असे केल्याने कांदा पुन्हा पुन्हा हातातून निसटणार नाहीत आणि बोटांना दुखापत होणार नाही.

2) कांदे कापताना प्रथम त्यांचे वरचे आणि खालचे भाग चाकूने कापून वेगळे करा. असे केल्याने तुम्हाला साल काढणे सोपे जाईल आणि तुम्ही त्यांना चॉपिंग बोर्डवर व्यवस्थित धरू शकाल.

3) कांदा बारीक चिरण्यासाठी, प्रथम सोलून घ्या. जर तुम्ही साल वेगळे न करता कापले तर त्रास होऊ शकतो आणि ते सहज कापले जाणार नाही.

4) जेव्हा तुम्ही कांदे कापता तेव्हा त्याच्या मुळाचा भाग धरून आडवे काप करायला सुरुवात करा. हे करत असताना कांदा घट्ट धरून ठेवा. असे केल्याने ते सटकणार नाहीत आणि चाकूने हात कापण्याची भीतीही राहणार नाही.

कांदा मधोमध कापून त्याचे दोन भाग करा आणि आता त्याचा सपाट भाग खाली ठेवा आणि समोरून कापा.