केस पांढरे झालेत? तेल बदलूनही उपयोग झाला नाही; काळ्याभोर केसांसाठी शहनाज हुसैनचा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 06:24 PM2022-12-20T18:24:39+5:302022-12-21T16:30:22+5:30

How to get black hairs Naturally : केसांना हे तेल लावल्यानंतर नेहमीप्रमाणे शॅम्पूनं केस धुवा. सल्फेट असलेल्या शॅम्पूचा वापर तुम्ही करू शकता.

सुंदर काळे केस असावेत असं प्रत्येकाचच स्वप्न असतं. आजकाल चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढलंय. (Home Remedies for Gray Hair) केस काळे करण्याचं तेल वापरूनही हवा तसा बदल दिसत नाही. केस जास्तच पांढरे दिसतात. त्यामुळे पैसे तर जातातच याशिवाय मानसिक ताणही येतो. (Hair Care Tips) सौंदर्यतज्ज्ञ शहनाज हुसैन यांनी पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही शहनाज हूसैन यांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत. (Black Hair Solution)

व्हिटामीन बी १२, व्हिटामीन सी आणि व्हिटामीन ईच्या कमतरतेनं केस गळतात. जिंक किंवा कॉपरच्या कमरततेनंही केस गळतात. जास्त प्रमाणात स्मोक करणं, मेलेनिन कमी होणं केस पांढरे होण्याचं कारण ठरू शकतं.

शहनाज हुसैन यांनी घरच्याघरी केसांना काळे करण्याच्या तेलाबद्दल माहिती दिली आहे. हे तेल तयार करण्यासाठी १० ते १५ आवळे उन्हात सुकवून घ्या. आवळे सुकल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करून घ्या. ही पावडर लोखंडाच्या कढईत ५ मिनिटं भाजा आणि नारळाच्या तेलात मिसळा. हे तेल १५ दिवस उन्हात ठेवा.

केसांना साामान्य तेल लावण्यापेक्षा हे तेल लावा. केसांच्या मुळांना आणि स्काल्पला हे तेल लावा. त्यानंतर केस स्वच्छ धुवा आणि आठवड्यातून २ वेळा तेल अनियमितरित्या लावा.

हा उपाय करताना बाजारातले डाय वापरणं बंद करा. यामुळे केसांचं नुकसान होऊ शकतं.केसांना हे तेल लावल्यानंतर नेहमीप्रमाणे शॅम्पूनं केस धुवा. सल्फेट असलेल्या शॅम्पूचा वापर तुम्ही करू शकता.

केसांना हेल्दी ठेवण्यासाठी डाएटवर लक्ष देणंही तितकंच महत्वाचं आहे. आहारात टोमॅटो, संत्री, स्पाऊट ग्रेन्स आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा.

आहारात प्रोटीन्सयुक्त पदार्थ आणि अंड्याचा समावेश करा.

हिटींग टूल्सचा वापर जास्त प्रमाणात करू नका.