ऑक्टोबर हिटमुळे घरात खूप मुंग्या झाल्या? ४ सोपे उपाय- लाल मुंग्या घरात दिसणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2023 10:39 AM2023-10-11T10:39:51+5:302023-10-11T10:45:27+5:30

१. साधारणपणे उन्हाळ्यात घरात मुंग्या दिसण्याचे प्रमाण खूप वाढलेले असते. त्यानंतर पावसाळ्यात पुन्हा त्या कमी होतात. आणि ऑक्टोबर हिटच्या (October heat) उष्णतेमुळे पुन्हा घरभर मुंग्या दिसायला सुरुवात होते.

२. आता मुंग्या कमी करण्यासाठी बाजारात औषधी मिळतात, खडू मिळतो. पण घरात लहान मुलं असतील तर असे उपाय करायला जरा भीती वाटते. कारण मुलं कधी कोणत्या गोष्टीला हात लावतील आणि ती तोंडात घालतील सांगता येत नाही.

३. त्यामुळेच मुग्यांना दूर ठेवण्यासाठी पुढे सांगितल्याप्रमाणे असे काही घरगुती उपाय करा. हे उपाय लहान मुलांच्या दृष्टीनेही सुरक्षित आहेत आणि शिवाय करायलाही अगदी सोपे आहेत.

४. आता यातला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे लिंबू. एक कप लिंबाचा रस असेल तर तो ४ कप पाण्यात मिसळा आणि हे पाणी जिथे मुंग्या जास्त दिसतात अशा भागात शिंपडा.

५. लिंबाच्याऐवजी तुम्ही व्हिनेगरचा वापरही करू शकता. ३ टेबलस्पून व्हिनेगर २ ग्लास पाण्यात मिसळा. हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि दररोज घरात स्प्रे करा.

६. दारांच्या फटी, भिंतीला पडलेली एखादी भेग, किचन ओट्याचा खालचा भाग या काही ठिकाणांहून मुंग्या बाहेर येण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे या भागांवर दिवसातून एकदा कॉफीचे पाणी शिंपडून ठेवा. मुंग्या दिसणार नाहीत.

७. मीरेपूड आणि मीठ सम प्रमाणात एकत्र करा. हे मिश्रण भिंतीच्या कडेकडेने जमिनीवर टाकून ठेवा. किंवा टेबलवर, किचन ओट्यावर जिथे अन्नपदार्थ ठेवत असाल, त्याभोवती टाकून ठेवा. मुंग्या त्या ठिकाणी फिरकणाही नाहीत.