How to get rid of cockroach? 5 remedies to keep cockroaches away from your house
घरात सतत झुरळं होतात? ५ गोष्टी न विसरता करा, घरात कधीच झुरळं होणार नाहीत By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2023 12:44 PM2023-11-17T12:44:59+5:302023-11-17T12:53:05+5:30Join usJoin usNext काही घरांमध्ये सतत झुरळं होत असतात. झुरळं मारण्याचा स्प्रे फवारला तरी पुन्हा एखाद्या महिन्यातच परत घरात झुरळं फिरताना दिसतात. असं होऊ नये म्हणून काही बाबतीत स्वच्छता पाळणं गरजेचं आहे. म्हणूनच या ५ सवयी स्वत:ला लावून घेतल्या तर घरात पुन्हा झुरळं दिसणार नाहीत. या सवयी नेमक्या कोणत्या ते पाहूया... सगळ्यात पहिली सवय म्हणजे रात्री झोपण्यापुर्वी किचन ओटा, डायनिंग टेबल स्वच्छ करा. तिथे कुठेही खरकटे पडले असेल तर ते लगेच उचलून पुसून घ्या. अन्नाचे कण नेहमीच रात्रभर ओट्यावर राहात असतील तर झुरळं होणारच. बऱ्याचदा आपण ओटा स्वच्छ करतो, पण गॅसच्या खाली किंवा सिंकच्या खालच्या कोपऱ्यात खरकटं तसंच राहतं. त्यामुळे ओटा तर पुसून घ्याच पण ओट्याचा, डायनिंग टेबलजवळच्या कानाकोपरा पुसून स्वच्छ करा. अनेक घरांमध्ये सिंकमध्ये कपबशा तशाच रात्रभर पडून असतात. ओलसर कप सिंकमध्ये ठेवू नका. रात्री कप घासून स्वच्छ करणं होत नसेल तर कप तसेच सिंकमध्ये पडू न देता एका पातेल्यात भरून ठेवा आणि त्यावर झाकण ठेवून द्या. दर २- ३ दिवसांतून एकदा सिंकमध्ये १ टेबलस्पून बेकिंग सोडा टाका आणि त्यावर १ ग्लास गरम पाणी टाका. यामुळे सिंकचा पाईप स्वच्छ होतो आणि झुरळं येणं बंद होतं. दर २- ३ दिवसांतून एकदा सिंकमध्ये, ओट्यावर, गॅसखाली कांद्याची टरफलं, लवंग टाकुन ठेवा. टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्सस्वच्छता टिप्सSocial Viralkitchen tipsCleaning tips